भाग दोन - कलम ५

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.


संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व .

५ . या संविधानाच्या प्रारंभी , भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि ---

( क ) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ; किंवा

( ख ) जिच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते ; किंवा

( ग ) जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे , अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल .

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP