मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
सद्‌गुरुदेवा द्या मजला चर...

भक्ति गीत कल्पतरू - सद्‌गुरुदेवा द्या मजला चर...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


सद्‌गुरुदेवा द्या मजला चरण सेवा ॥धृ०॥

सेवा वाटे गोड । तेणें पुरतील मनींचें कोड ।

देहबुद्धी ही जाईल द्वाड । सुटेल संसार गोवा । द्या मजला० ॥१॥

सेवेमध्ये आनंद भारी । संसारदुःख दूर करी ।

भवभय नाही तीळभरी । मुक्त करी जीवा० । द्या मजला० ॥२॥

सेवा करीतां आत्मप्रकाश । पाहुनी अज्ञानाचा नाश ।

सौख्य देतां तें अविनाश । वारीचा हा ठेवा० । द्या मजला० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP