सत्याम्बा व्रतकथा - अध्याय पहिला

श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय.


अध्याय पहिला

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वतै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्॥ सर्वे श्रोताराः सावधाना भवन्तु ॥
श्रीव्यास म्हणतात - एके काळी नैमिषारण्यात शौनकादिक ऋषि कथा ऐकण्याविषयीं उत्सुक होऊन अतिशय पुरातन असा जो 'सूत' त्यास विचारु लागले ॥१॥
अहो, वक्‍त्यांमध्ये श्रेष्‍ठ,
व्यास उवाच ॥ एकदा नैमिषारण्य ऋषयः शौनकादयः ॥ पप्रच्छुः श्रवणाल्हादात्सूतं पौराणिकं खलु ॥१॥
भो भोःसूत महाप्राज्ञ वक्‍तृणामवतंसक ॥ भवद्वाणीप्रवाहेण चायुष्य निश्चितं हि नः ॥२॥
महाबुद्धिमन् सूत महर्षे, तुमच्या वाणीरुपी प्रवाहाच्या योगे आमचे आयुष्य निश्चयेकरुन सफल झाले आहे. ॥२॥
म्हणून आम्ही आता तुमची प्रार्थना करितो की, कोणत्या व्रताने अथवा तपाने इच्छिलेले फळ प्राप्‍त होईल, तें आम्हास कथन करा ॥३॥
अहो सूत, कृपा करुन आता कलीमध्ये लवकर फल देणारे असे जे व्रत अथवा तप असेल, त्याचे सार काढून ते आम्हांस सांगा ॥४॥
सूत
तस्माद्वयं प्रार्थयामोऽधुना त्वां वद निश्चितम्॥ केन व्रतेन तपसा प्राप्यते वांच्छितं फलम् ॥३॥
कृपा कृत्वाऽधुनाऽऽयुष्मन्फलदं वा व्रतं तपः ॥ सारं निष्काम्य वद नः कलौ शीघ्‍रफलप्रदम्॥४॥
सूत उवाच श्रृणुघ्‍वमृषयः सर्वे सत्याम्बाव्रतमुत्तमम्॥ नदीनां च यथा गंगा मानवानां द्विजो यथा ॥५॥
तथा व्रतसमूहानां सत्याम्बाव्रतमुत्तमम् ॥ पुरा शिवः सुपृष्‍टोऽसौ षण्मुखेनैव संकटे ॥६॥
म्हणतात - हे ऋषींनो, उत्तम असे सत्याम्बाव्रत ऐका. नद्यांमध्ये ज्याप्रमाणे गंगा अथवा मनुष्यांमध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण, ॥५॥
त्याप्रमाणे व्रतसमुदायांत उत्तम असे सत्याम्बाव्रत आहे. पूर्वी संकटाचे वेळी कार्तिकेय स्वामीने शंकरास असाच प्रश्न केला होता. ॥६॥
देव व दैत्य हयांच्या युद्धामध्ये मोठे संकट प्राप्‍त झाले असता अत्यंत व्याकूळ होऊन (कार्तिकेय स्वामीने) आपल्या पित्यास-शंकरास विचारिलें. ॥७॥
षडानन म्हणतात - हे भक्तावर दया करणार्‍या कृपासागरा महादेवा, अत्यंत कठीण अशा या संकटापासून माझे रक्षण करा. ॥८॥
हया बालकावर दया करुन (अतिशय) त्वरित फल देणारे असे एखादे व्रत (मला) सांगा.
देवदानवयुद्धेषु महासङ्‌कटमाप्तवान् ॥ अतीव व्याकुलो भूत्वा पितरं पर्यपृच्छत ॥७॥
षडानन उवाच ॥ देवदेव महादेव भक्तानुग्रहकारक ॥ त्राहि त्राहि कृपासिन्धो संकटादतिदुस्तरात् ॥८॥
बालोपरि कृपां कृत्वा वद शीघ्‍रं फलप्रदम्॥ शिव उवाच ॥ एकाग्रमनसा पुत्र शृणुष्व फलदं व्रतम् ॥९॥
पुरा त्रिपुरदाहे च संकटं प्राप्तवानहम् ॥ जनान्सर्वान्विलोक्यार्थं क्षीणपुण्यांश्च दुर्भगान ॥१०॥
श्रीशिव म्हणतात - हे मुला, शीघ्र फल देणारे असे व्रत मी सांगतो, ते एकाग्र चित्ताने ऐक ॥९॥
पूर्वी त्रिपुरासुराच्या वधाचे वेळी मजवर असेच संकट आले होते. ज्यांचे पुण्य थोडे आहे असे दुर्दैवी लोक पाहून ॥१०॥
तसेच अति दुःखामुळे पीडलेले, अल्पायुषी, नीच कुळात उत्पन्न झालेले असे लोक पाहून मी अगदी व्याकुळ झालो होतो. तेव्हा आकाशवाणी झाली. ॥११॥
आकाशवाणी म्हणाली - हे शंभो, माझे भाषण ऐक, म्हणजे तू संकटापासून मुक्‍त होशील. सत्यांबेच्या कृपेने तुझे कल्याण होईल. ॥१२॥
अतिक्लेशेन संत्रस्तान्क्षीणायुष्यान्कुयोनिजान् ॥ अतिव्याकुलचित्तोऽहं तदा खाद्वाण्यजायत्॥११॥
आकाशवाण्युवाच । हे शम्भो शृणु मद्वाक्यं सङ्‌कटाद्वितरिष्यसि ॥
सत्यम्बायाः प्रसादेन कल्याणं ते भविष्यति ॥१२॥
इति श्रुत्वा मया तत्र सत्याम्बाव्रतमुत्तमम् ॥ मनसा ध्यानमात्रेण सर्व ज्ञात्वा मया कृतम्॥१३॥
तदेवाहं प्रवक्ष्यामि शृणुष्वैकाग्रमानसः ॥ सत्या भगवती देवी सा पूज्या संक्रमे
असे मी तेथे ऐकून ते उत्तम सत्यांबाव्रत मनाने-ध्यान करुन सर्व काही जाणले व त्याप्रमाणे ते व्रत केले ॥१३॥
तेच मी तुला सांगतो, तू एकाग्र चित्ताने ऐक. ती सत्यांबा देवी सूर्यसंक्रांतीचे दिवशी पुजावी. ॥१४॥
अथवा अष्‍टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार हया दिवशी, अथवा ज्या दिवशी मनात उल्हास येईल त्या दिवशी प्रदोष काळी तिचे पूजन करावे. ॥१५॥
स्वस्तिवाचनपूर्वक गणेश व वरुण हयांची पूजा करुन आणि पीठपूजा करुन यथासांग देवीची स्थापना करावी. ॥१६॥
मोठया भक्‍तीने ब्राह्मण, बंधु, इष्‍टमित्र वगैरे सह गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप आणि दुर्वा यांच्या सहाय्याने देवीची
दिने ॥१४॥
अष्‍टम्यां भौमवारे च पूर्णिमायां भृगोर्दिने ॥ यदा वा मानसोल्लासः प्रदोषे पूजनं तदा ॥१५॥
स्वस्तिवाचनपूर्वं तु गणेशं वरुणं तथा ॥ पीठपूजां विधायाथ साङ्‌गोपाङ्‌गा च स्थापयेत् ॥१६॥
ब्राह्मणैर्बन्धुवर्गैश्च भक्तिभावसमन्वितः ॥ गंधपुष्पाक्षतैर्दूर्वाधूपदीपैश्च पूजयेत् ॥१७॥
नैवेद्यं भक्तितो दद्यात्सार्धंप्रस्थैः प्रयत्‍नतः । शुद्धाग्रौ पक्वगोदुग्धं घट्टितं घृतशर्करा ॥१८॥
पूजा करावी. ॥१७॥
भक्‍तीने नैवेद्य अर्पण करावा. शुद्ध अग्नीवर आटविलेले दूध, खवा, तूप, साखर, ॥१८॥
चांगल्या गव्हाचे पीठ (रवा), ही सर्व प्रत्येकी दीड शेर घेऊन ती एकत्र करुन त्यात थोडे केशर घालून उत्तम प्रकारचे लाडू करावे. (हा एक नैवेद्य प्रसाद करावा.) ॥१९॥
(आणि दुसरा नैवेद्य) साखर घालून खीर करावी. याप्रमाणे दोन पदार्थांचा नैवेद्य देवीस अर्पण करावा आणि सत्यांबेविषयी भक्ति धरुन मित्र व आप्त हयासह ॥२०॥
कथा श्रवण करुन ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. आणि यंत्राची,
शुद्धगोधूमचूर्णं च सार्धप्रस्थमितं तथा । किञ्चित् काश्‍मीरसंस्कारं कृत्वा कुर्यात्सुलड्‌डुकात् ॥१९॥
पायसं सितया मिश्रं देव्यै नैवेद्यमर्पयेत् ॥ सत्याम्बाभक्तिसम्पनौ मित्रैर्बन्धुगणैः सह ॥२०॥
कथां श्रुत्वा जनैः सार्धं दद्यात्‌विप्राय दक्षिणाम् ॥
यन्त्रं वा प्रतिमा पूज्या स्वर्णरौप्यायसी मता ॥२१॥
सर्वेभ्यस्तं प्रसादं च दत्वाऽद्यच्च स्वयं ततः ॥
ततश्च स्वजनैः साकं ब्राह्मणान्प्रति भोजयेत् ॥२२॥
सोन्याची अगर रुप्याची प्रतिमा करुन तिची पूजा करावी. ॥२१॥
सर्वांस प्रसाद देऊन स्वतःही घ्यावा. नंतर आप्तजन व ब्राह्मण हयास भोजन द्यावे व आपणही भोजन करावे ॥२२॥
गाणे, नाचणे, (गीत नृत्य) वगैरे करवून नेहमी सत्यांबादेवीचे स्मरण करावे; नंतर देवीचे मंदिरात पूजा केली असेल तर ते मंदिर सोडून घरी जावे ॥२३॥
शंकर म्हणतात, 'हे षडानना, हे सत्यांबाव्रत त्वरित इच्छा पुरविणारे आहे. मुला, कलियुगात महत् (मोठे) फळ देणारा हा लहानसा उपाय आहे. ॥२४॥
ज्या दिवशी व्रत करण्याविषयी मनुष्य संकल्प करील, त्या दिवशी
गीतं नृत्यादिकं कृत्वा सत्याम्बां तु सदा स्मरेत् ॥ अम्बालये पूजनं चेत्ततश्च स्वगृहं व्रजेत् ॥२३॥
एतद्‌व्रतं त्वम्बिकाया वाञ्छापूर्तिकरं परम् ॥ अयं कलियुगे पुत्र लघूपायः फलप्रदः ॥२४॥
यस्मिन्दिने व्रतारम्भसंकल्पं कारयेद् बुधः ॥ प्रातरारभ्यसायान्हं समुपोष्य समाहितः ॥ कायेन मनसा वाचा सत्याम्बाभक्‍तितत्परः ॥२५॥
सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपोषण करुन त्याने एकाग्रचित्त व्हावे, आणि कायावाचामनेकरुन श्रीसत्यांबादेवीच्या भक्‍तीविषयीं तत्पर असावे.
॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्याम्बाव्रतकथायां प्रथमोऽध्यायः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP