TransLiteral Foundation

श्रीशिवलीलामृत - सप्ताह-पारायण पध्दति

भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.


सप्ताह-पारायण पध्दति

सप्ताह-पारायण पध्दति

कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान्‌ श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

सोमवार - अध्याय १ व २

मंगळवार - अध्याय ३ व ४

बुधवार - अध्याय ५ व ६

गुरुवार - अध्याय ७ व ८

शुक्रवार - अध्याय ९ व १०

शनिवार - अध्याय ११ व १२

रविवार - अध्याय १२ व १४

रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे.

पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे.

पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा )

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:36:08.3370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बंदरसमा

  • स्त्री. बंदरामध्यें पूर्ण भरतीची स्थिति . या वेळीं खाडींत भरती असतेच असें नाही .' - मातीर्थ ४ . ६ . 
RANDOM WORD

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site