मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
या बाळांनो

भावगंगा - या बाळांनो

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


या बाळांनो गीता गाऊ गीता-माई प्रेमळ फार
गीता देते अभिवचनाला हरते चिन्ता करि उद्धार
योगेश्वर भगवान जयजय योगेश्वर भगवान ॥धृ॥
गीता सांगे जीवन सगळे मौलिक मोठे अपरंपार
सुख-दु:खामधि गीता एकच मानव जीवा जीवा दे आधार
कोडीं सुटती गुंफण सगळी गीता करिते सहजाकार ॥१॥
गीता शिकवी त्याग फलाशा, सुचवी अविरत मधु सुविचार
अनन्य बनता गीता चुकवी जनन-मरणही भयदाकार
गीता मोठी मानव मोठा प्रभुमिलनाचे मुक्तद्वार ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP