मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
झडकरी येई

श्री स्वामी समर्थ - झडकरी येई

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


झडकरी येई दत्ता
श्रीगुरु स्वामी समर्था
धावत येई आता, श्रीहरि स्वामी समर्था

अज्ञ असे मी बालक देवा
तू तर प्रेमळ माता
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था

लोटांगण घालितसे भावे
दूर करावी चिंता
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था

याचक मी तर तव दारीचा
तू सकलांचा दाता
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था

पतीतपावन म्हणती तुजला
तू दीनांचा त्राता
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था

नाम चिंतनी जाता रंगुन
तुझीच अमृतगाथा
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था

अधीर झाला जीव प्रभुवरा
दर्शन देई आता
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था

वाट पाहता शिणले डोळे
दया करी भगवंता
झडकरी येई दत्ता, श्रीहरि स्वामी समर्था
धावत येई आता, श्रीहरि स्वामी समर्था

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP