मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
आज आमुची एकादशी

पुरंदरायण - आज आमुची एकादशी

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


आज आमुची एकादशी । जन म्हणती दुप्पट खासी ।
आज आमुची एकादशी ॥ध्रृ॥
साबूदाणा थालीपीठ । वर साईचे दही घट्ट
खजूर, शेंगदाणा लाडू । एका दमात फडशा पाडू
आज आमुची एकादशी ॥१॥
दहिपोहे दूध केळी । या गं बाया पोरीबाळी
सांजवेळी विचार करा । घरा आपुला तुपातील शिरा
आज आमुची एकादशी ॥२॥
या हो करु हरिकथा जागर । नको बाई झोप अनावर
पत्नीविरह आम्हा साहिना । श्री पुरंदर विठ्ठल आकळेना
आज आमुची एकादशी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP