समवृत्ती प्राणायाम

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


१. सम म्हणजे सारखा, एकजातीय, सरळ, संपूर्ण, परिपूर्ण; एकाच पध्दतीचा.
२. वृत्ती म्हणके क्रिया, चलन, प्रयोजन किंवा व्यवहार, वर्तनक्रम किंवा पध्दती.
३. तेव्हा, कोणत्याही प्रकारच्या प्राणायामात पूरक, कुंभक व रेचक या तीन श्वसनक्रियांच्या अवधीमध्ये समानता साधण्याचा प्रयत्न समवृत्ती प्राणायामामध्ये केला जातो. एकीला जर ५ सेकंद लागले, तर इतर क्रियांनाही तेवढाच वेळ लागतो.
४. उज्जायी, सूर्यभेदन, नाडीशोधन, शीतली वगैरे कोणत्याही प्रकारच्या प्राणायामाच्या सर्व आवर्तनांमध्ये ५ सेकंदाचा हा समान अवधी ठेवला जावा.

इशारा
५. प्रारंभी समवृत्ती प्राणायाम फक्त पूरक आणि रेचक यांपुरताच करावा.
६. प्रथम पूरक आणि रेचक यांच्या कालावधीमध्ये सारखेपणा साधा आणि मगच आंतर कुंभक साधण्याचा प्रयत्न करा.
७. आंतरकुंभक टप्प्याटप्प्याने सुरु करा. प्रारंभी पूरक, आंतरकुंभक व रेचक यांचे प्रमाण १ : १/४ : १ असे ठेवावे. अगदी हळूहळू हे प्रमाण १ : १/२ : १ येथपर्यंत वाढवावे. हे प्रमाण पूर्णपणे आत्मसात झाले म्हणजे मग १ : ३/४ : १ हे प्रमाण घ्यावे. त्यावर प्रभुत्व मिळाले, की मगच आंतर कुंभकाचा अवधी वाढवून प्रमाण १: १: १ असे साधावे.
८. पूरक, आंतरकुंभक व रेचक यांचे १ : १ हे इष्ट प्रमाण साधू लागण्याच्या अगोदर बाह्य कुंभक करण्याचा प्रयत्न करु नका.
९. फुफ्फुसांमधून सर्व हवा काढून टाकली तर आतली पोकळी आणि बाहेरच्या हवेचा दाब यांमुळे फुफ्फुसांवर प्रचंड ताण येईल. त्यासाठी प्रारंभीच्या काळात आंतरकुंभक व बाह्य कुंभक एकाच वेळी करु नका.
१०. आंतरकुंभक व बाह्य कुंभक वेगवेगळ्या वेळी किंवा एकानंतर दुसरा अशा आड क्रमाने करा. फक्त पूरक व रेचक यांच्या दीघ श्वसनाच्या दोन किंवा तीन आवर्तनानंतर मध्ये मध्ये कुंभकाचा सराव करावा. उदाहरणार्थ, प्रथम दीर्घ श्वसनाची दोन तीन आवर्तने करावी, नंतर आंतरकुंभकाचे एक आवर्तन करावे. नंतर दीर्घ श्वसनाची दोन किंवा तीन आवर्तने केल्यावर बाह्य कुंभकाचे एक आवर्तन करावे. ३ आंतरकुंभक आणि बाह्य कुंभक यांसह सुरुवात करा आणि अगदी सावकाश कुंभकांची संख्या वाढवा.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP