उदकवहस्त्रोतस् - परिचय

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


उदकवहानां स्त्रोतसां तालुमूलं क्लोम च ।
च.वि. ५-१० पान ५२५

तालु व क्लोम हें उदकवाही स्त्रोतसाचें मूळ आहे. या दोनहि अवयवासंबंधीं वैद्य वर्गामध्यें अद्यापि एकमत झालेलें नाहीं. केवळ वचनांचा विचार केला व त्यावरच संपूर्णपणें अवलंबून राहावयाचें ठरविलें तर सर्व वचनांचा समन्वय होऊन एकवाक्यता उत्पन्न होण्याची शक्यताहि असंभवनीय वाटण्यासारखी परिस्थिति आहे.

क्लोमजयां (विद्रध्यां) पिपासामुखशोषगलग्रहा: ।
च.सु. १७. १०१

श्वासो यकृति हिक्का च पिपासा क्लोमजेऽधिका
सु.नि. ९. २२

श्वासो यकृति रोधस्तु प्लीन्हयुच्छ्‍वासस्य तृट्‍ पुन: गलग्रहश्च
क्लोम्नि स्यात् सर्वाड्गप्रग्रहो हृदि ।
अ.सं. नि. ११

अध्वप्रशोषी स्त्रस्ताड्ग: संभृष्टपरुषच्छवि: प्रसुप्तगात्रावयव:
शुष्कक्लोमगलानन: ।
सु.उ. ४१. २१

जिह्वातालुगलक्लोमशोषे मूर्ध्नि च दापयेत् ।
सु.उ. ३९-१८४

क्षुद्रवातो यदा कोष्ठाव्द्यायामपरिघट्टित: कंठे प्रपद्यते हिक्कां
तदा क्षुद्रां करोति स: यत: प्रवर्तते पूर्व तत एव निवर्तते ।
हृदयं क्लोम कंठं च तालुकं च समाश्रिता ।
च.चि. १७. ३४, ते ३७

उर: कण्ठशिर: क्लोमपर्वाण्यामाशयो रस: मेदो घ्राणं रसनं
च श्लेष्मस्थानानि । अत्राप्युरो विशेषेण ।
अ.सं. सू. १२. ३

पञ्चदश कोष्ठाड्गानि तद्यथा-नाभिश्च हृदयं च क्लोम च ।
यकृच्च प्लीहा च वृकौ च बस्तिश्च पुरीषाधारश्चामाशयश्च
पक्वाशयोत्तरगुदं चाधरगुदं च क्षुद्रान्त्रं च स्थूलान्त्रं च
वपाहननं चेति ।
च.शा. ७. १०

पञ्चदश कोष्ठड्गानि तद्यथा-नाभिश्च हृदयं च क्लोम च
यकृच्च प्लीहा च इ०
भेलसंहिता शा. ७

कोष्ठाड्गानि स्थितान्येषु हृदयं क्लोम फुफ्फुसम् ।
यकृत्प्लीहोण्डुकं वृकौ नाभिडिंभान्त्रवस्तय: ।
वा.शा. ३. १२

मांसपेशिचयो रक्तपद्माकारमधोमुखम् ।
तस्य दक्षिणत: क्लोम यकृत्फुष्फुसमास्थितम् ।
समानवायुप्रध्माताद्रक्ताद्देहोष्मपाचितात् ।
किंचिदुच्छ्रितरुपस्तु जायते क्लोमसंज्ञितम् ।
अरुणदत्त: शा: ३-१२

नाडीषु हृदयक्लोमनिबद्धा हृदययकृत्क्लोमनाडीषु (संघय: )
अ.सं

कण्ठहृदयनेत्रक्लोमनाडीषु मण्डला: (संधय:)
सु.शा. ५. २७

हृदये चाक्षिकुटे च कंठे क्लोम्नि गुदे तथा ।
ज्ञेयो मण्डसंधिस्तु भागेष्वेतेषु दन्तिन: ।
हस्त्यायुर्वेदशल्ये ९. १६१

बाह्याभिघाताद्वातादिदोषेभ्यश्च तत्र हृदयेऽभिहते कासश्वास-
बलक्षयकण्ठशोषक्लोमापकर्षणजिह्वानिर्गममुखतालुशोषाप-
स्मारोन्मादप्रलापचित्तनाशादय: स्यु:
च.सि. ९. ७

शोणितकफप्रसादजं हृदयं तस्याधो वामत: प्लीहा फुप्फुसश्च
दक्षिणतो यकृत्क्लोम च ।
सु.शा. ४-३१

तस्य (हृदयस्य) वामपार्श्वे प्लीहा फुप्फुसश्च दक्षिणतो
यकृत क्लोम च ।
अ.सं.झा. २९१

यकृद्‍धृयपार्श्व (पार्श्वे) च क्लोम वक्ष:स्थितं
हस्त्या शल्य ९-११

तस्माद्गर्भेण जातस्य हृदयं जायतेऽग्रत: ।
तत: संजायते क्लोम यकृद्‍ वृकौ त्रयं तथा ।
हस्त्या० श. ९-३०

यानि खल्वस्य गर्भस्य मातृजानि यानि चास्य मातृत:
संभवन्ति तान्यनुव्याख्यास्याम: ।
तद्यथा त्वक् च लोहितं च मांसं च मेद्श्च नाभिश्च हृदयं
च क्लोम च यकृच्च प्लीहा च वृकौ बस्तिश्च पुरीषाधानं
चामाशयश्च पक्वाशयश्चोत्तरगुदं च क्षुद्रान्त्रं च स्थूलान्त्रं च
वपा च व्पावहनं चेति मातृजानि ।
च.शा. ३-१२

स्नेहपीतस्य मन्दाग्ने: क्षीणस्यातिकृशस्य वा ।
अत्यम्बुपानान्नष्टेऽग्नौ मारुत: क्लोम्नि संस्थित: ।
स्त्रोत:सु रुद्धमार्गेषु कफश्चोदकमूर्च्छित: ।
वर्धयेतां तदेवाम्बु तदेवाम्बु स्वस्थानादुदराय तौ ।
च.चि. १३. ४५-४६

हृदयात्  ते परि क्लोम्नो हलीक्ष्णात् पार्श्वाभ्याम् यक्ष्म मत-
स्नाभ्यां प्लीह्ने यक्नस्ते वि वृहामसि ॥
हे रुग्ण ते तव हृदयात हृदयपुण्डरीकाद्‍ यक्ष्म वि वृहा-
मसीति उत्तरत्र संबंध: ।
तथा परिक्लोम्न: हृदयसमीपस्थो मांसपिण्डविशेष: क्लोमा ।
हलीक्ष्णात् एतत् संज्ञकात् तत्संबद्धात् मांसपिडविशेषात्
पार्श्वाभ्यां दक्षिणोत्तराभ्याम् मस्तनाभ्यां उभयपार्श्वसंबद्धाभ्यां
वृक्काभ्यां तत्समीपस्थ पित्ताधारपात्राभ्यां वा ।
प्लीह्न: उदरपार्श्वस्थितात् श्येनपत्राकारात् मांसपिण्डात् ।
यक्न: हृदयसमीपस्थाद्‍ एतत्संज्ञकात् कालखंडात् ।
अथर्ववेद २-३३-३ सायणभाष्यासह

क्लोमालाच तिल असा एक प्रतिशब्द आहे. त्यासंबंधीं शारंगधरामध्यें जें वर्णन आलेलें आहे तें महत्त्वाचें आहे. आयुर्वेदामधील शारीर हे रचनेपेक्षां कार्याचें महत्त्व लक्षांत घेऊन वर्णिलेलें असतें. हा सूत्रमय सिद्धांत एकदां लक्षांत घेतला म्हणजे परस्पर विरोधी वचनांतून मार्ग काढणें तितकेसें अवघड राहात नाहीं.

जलवाहिशिरामूलं तृष्णाच्छादनकं तिलम्
शा.प्र.अ. ५-४५ पान ५७

तिलं तु शोणितकतिकट्टप्रभवं दक्षिणाश्रितं यकृत्समीपे
क्लोम संज्ञकं भवति ।
तच्च जलवाहिशिरामूलं कथितम्, अतएवतृष्णाच्छादनकं प्रतिपादितम् ।
तृष्णा पिपासा तस्याश्छादनं करोतीत्यर्थ: ।
शा.प्र.५-४५ दी. टीका पान ५८

तिलवृक्कौ आहारजलवाहिशिरामूलौ, तिलं किं भूतं तृष्णाच्छादनकम् ।
शा.प्र. ५-४५, गु. टीका पान ५८

क्लोमासंबंधीची ही व यासारखी इतरहि अनेक वचनें लक्षांत घेतलीं असतां क्लोम म्हणजे पृष्ठवंश असावा असें म्हणतात पण नि:शंकपणा मात्र नाही. काहीं, आधुनिक शारीर रचनेच्या वर्णनाप्रमाणें `पँक्रिया' ला क्लोम म्हणतात, तर काही उजवीकडीलच्या फुप्फुसालाच क्लोम म्हणतात, कांहीं कंठाजवळील भागाला क्लोम म्हणतात. यांतील `पँक्रिया' ला क्लोम म्हणणारा पक्ष बराच बलवान आहे. परंतु कोष्ठांगामध्यें पृष्ठवंशनाडीसारखा महत्त्वाचा अवयव वर्णन करणें आवश्यक असतांना, तो उपेक्षिला जाणें हें प्राचीनाआचार्यांच्या सूक्ष्म दृष्टीचा विचार करतां संभवनीय वाटत नाहीं.
स्त्रोतसांचीं जीम मूलें वर्णन केलेलीं आहेत तीं तत्तत् स्त्रोतसांच्या भावाचें वा कार्याचें नियंत्रण करणारीं असलीं पाहिजेत. त्या दृष्टीनें शिर, व मुख तालु यांच्या अंतर्गत तालु मूल व त्याशीं संबद्ध असा जलयुक्त अवयव पृष्ठवंशनाडी हाच क्लोम शब्दानें अभिप्रेत असावा असें कांहीं विद्वान वैद्यवरांचें मत आहे निर्णय सांगणें आम्हास कठीण वाटतें. हें प्रकरण खरोखरीच चक्रदत्तानें थोडया निराळ्या संदर्भामध्यें उल्लेखिलेल्या प्रकारासारखें असून निश्चित निर्णय घेतांना आम्हासहि चक्रदत्ताप्रमाणेंच -
``तदत्रातींद्रियार्थदर्शिगम्ये नास्म्विधानां बुद्धय: प्रभवन्ति'' ।
(च.वि. ५-१२ टीका पान ५२६) असें म्हणावेसें वाटतें.

अपां धातुरित्येननासमासकरणेन रसजलमूत्रस्वेदमेद:
कफपित्तरक्तादयो ग्राह्या: ।
मा.नि. अतिसार ४ म. टीका पान ७३

उदकवह स्त्रोतसाच्या व्याप्तीचा विचार करतां ज्या ज्या ठिकाणीं, ज्या ज्या अवयवांच्यामध्यें वा दोष धातु मलांच्यामध्यें जलीय अंश प्राधान्यानें अस्तित्वांत असल्याचें प्रत्ययास येतें त्या सर्वांना व्यापून उदकवहस्त्रोतस् असतें असें समजलें पाहिजे. रस, रक्त, मेद, शुक्र, लसीका, कफ, पित्त, मूत्र, स्वेद या सर्वांना उदकाचाच आश्रय असतो.
उदक वह स्त्रोतसाचें स्पष्टीकरण करतांना वैद्यराज भा.वि. गोखले यांनीं म्हटलें आहे कीं ``उदकाची उत्पत्ति व वहन या दोन्ही क्रिया उदकवह स्वतंत्र उल्लेख विकृतिप्रकरणीं अतिसार उदर इत्यादि रोगामध्यें शास्त्रकारांनीं केला आहे. रस धातूचे गुणधर्म सांगत असतांना तो द्रवानुसारी आहे असें म्हटलें आहें. (सु.सू.१४-३) म्हणजे रसरक्तादिद्रव्यांचें वहनाचें साधन म्हणून अप्‍ धातूचा शरीरास उपयोग आहे. म्हणून शरीर आप्यायनकर असे हें स्त्रोतस् आहे.''
(शा.विज्ञान पान २४६)

दशैवांजलय: प्रोक्ता उदकस्य त्वगाश्रया: ।
तेनोदकेन पुष्यंति धातवो लोहितादय: ।
अतिसारे पुरीषंच ततो मूत्रं प्रवर्तते ।
व्रणे लसीका पूयं च पिच्छा चात: प्रवर्तते ।
भवन्ति तस्मिन् दुष्टे च दद्रु कंडु विचर्चिका: ।
त्वगामया: किलासानि पामा केशवधस्तथा ।
तदग्निमारुतोद्विद्धं कूपकै: स्वेद उच्यते ।
का.सं. पान ७८

उदक हें रस रक्तादीचे केवळ वाहक नसून एक घटकहि आहे. हेंहि गुरुवर्य गोखले यांच्या वरील स्पष्टीकरणाच्या जोडीनें लक्षांत ठेविले पाहिजे. शरीरामध्ये उदकाचें प्रमाण दहा अंजली असते. हें उद्क बहुतांशीं त्वचेच्या आश्रयानें राहाते. याच उदकामुळें शरीरांतील धातूंना द्रवांश मिळून त्यांचें पोषण होतें. अतिसाराचें वेळीं हेच उदक पुरीषाशीं संयुक्त होऊन बाहेर पडतें. मूत्रोत्पत्तीहि याच उदकावर अवलंबून आहे. व्रणांतून बाहेर पडणारी लसीका, शोथ उदर या सारख्या व्याधींमध्यें संचित होऊन उत्पन्न करणारी पिच्छा ही याच उदकाच्या विकृतीचा परिणाम म्हणून असते. शरीरामध्यें उत्पन्न होणारा पूय उदकाच्या विकृतीशीं संबद्ध असतो. उष्णता व वात यांच्या कारणानें रोमकूपामध्यें प्रकट होणारा स्वेद यासहि आधार या उदकाचाच आहे. चरकानें शारीतस्थानाच्या सातव्या आध्यायांत सूत्र १५ मध्यें उदक या भावाचें असेंच वर्णन केलें आहे. लसीका रुपानें कुष्ठ रोगांत कारण असलेली उदकाची विकृति कुष्ठाच्या संप्राप्तींतील एक महत्वाचा घटक आहे. वर उल्लेखलेल्या या सर्व भावामध्यें कफ हें उदकाचें प्राधान्यानें आश्रय स्थान आहे असें म्हणतां येईल. कफाचें कार्य सर्व शरीरभर बहुधा उदक स्वरुपानेंच होतें आणि पांचभौतिकदृष्टया कफ हा अप्‍ या महाभूतापासून बनलेला पदार्थ आहे. कफाचें हें उदक कर्मत्व सुश्रुतानें -

संधिसंश्लेषणस्नेहनरोपणपूरणबलस्थैर्यकृच्छ्लेष्मा पञ्चधा
प्रविभक्त उदककर्मणाऽनुग्रहं करोति ।
सु.सू. १५-४

पञ्चधा प्रविभक्त आशयभेदेन आमाशयोर: शिर: कण्ठसन्धिभेदेनत्यर्थ: ।
अन्ये तु तस्यैव कफस्याशयभेदेन पञ्चधाभिन्नस्य श्लेष्मक्लेदकबोधकतपर्ववलम्बकनामान्याहु: ।
केचिदत्र कफकर्मसु बृंहणं तर्पणं च पठन्ति, व्याख्यानयन्ति
च-`बृंहण: शरीरस्य, द्रवत्वमूर्तिमत्वाभ्यां; तर्पण: तृप्ति: धातूनाम्''
टीका सु.सू. १५-४ पान ६७

या ठिकाणीं स्पष्ट शब्दांत विस्तृपणें वर्णन केलेलें आहे. वैद्यराज भा.वि.गोखले यांनीं याच सूत्रावर जें भाष्य केलें आहे त्यांत ते लिहितात ``सुश्रुतांनीं या ठिकाणीं कफाचें सर्व कर्म उदक कर्मामुळें होतें असें म्हटलें आहे. ही गोष्ट चरकोक्त सोमशक्तीशीं जुळणारी अशी आहे. बाह्य सृष्टींतील व्यापारांना अनुलक्षून सोमाचा उल्लेख होतो तर `उदककर्मणा अनुग्रहं करोति' हें म्हणणें वस्तुस्थितीचा बरोबर बोध करुन देणारें असें आहे. कफ हें आप्य द्रव्य आहे व आपाचें स्निग्धत्व, शीतत्व व गुरुत्व या तिहींचा समावेश उद्‍ककर्मामध्यें होतो.''
(शा. क्रियाविज्ञान पान १९१)

कफ हा जलमहाभूतोद्भव असल्यामुळें त्यास चरकानें आप्य द्रव्य असें म्हटलें आहे. च.शा. ७-१६ पान ७०८
कफाच्या या आप्यत्वामुळें (च.शा.७-१६) कफक्षय व कफवृद्धीचीं लक्षणें ही उदकवहस्त्रोतसाशीं समानभावाची मानावीत व कफदुष्टीचीं कारणें उदकवहस्त्रोतसालाहि दुष्ट करतात असें समजावें.

उदकस्त्रोतसाच्या दुष्टीचीं कारणें
औष्ण्यादामाद्‍भयात् पानादतिशुष्कान्नसेवनात् ।
अम्बुवाहीनि दुष्यन्ति तृष्णायाश्चातिपीडनात् ॥
च.चि. ५-१९ पान ५२८

उष्णता, आमोत्पत्ति, भीति, मद्यादि द्रव द्रव्यांचें अतिपान, अत्यंत कोरडें अन्न खाणें, तहान मारणें, या कारणांनीं अंबुवह स्त्रोतसाची दुष्टी होते. अंबुवहस्त्रोतसाच्या दुष्टीचीं सहज दिसणारी लक्षणें प्राधान्यानें पुढीलप्रमाणें असतात.

प्रदुष्टानां तु खल्वेषनिदं विशेषविज्ञानं भवति ।
तद्यथाजिह्वाताल्वोष्ठकण्ठक्लोमशोषं पिपासां चातिप्रवृद्धां
दृष्ट्वा भिषगुदकवान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात‍ ।
च.वि. ५-१० पान ५२५-२६

जिह्वा, तालु, ओष्ठ, कंठ, क्लोम हे अवयव कोरडे झाल्यासारखें वाटणें व अतिशय तहान लागणें एवढींच लक्षणें, चरकानें उदकवहस्त्रोतसाच्या दुष्टीची म्हणून दिलीं असलीं तरी याहिपेक्षां अधिक अशी द्सरीहि लक्षणें, चरकास अभिप्रेत आहेत. म्हणून त्यानें उल्लेखिलेल्या लक्षणांना ती विशेषविज्ञान म्हणतो. या इतर लक्षणांमध्यें श्रम, रौक्ष्य, शोथ, गौरव, क्लिन्नता श्लथांगत्व अशीं इतरहि लक्षणें उदकवहस्त्रोतसाच्या दुष्टीमध्यें दिसतील.

उदकवहस्त्रोत:परीक्षा
उदकवहस्त्रोतसाची परीक्षा करतांना मुखांतील आर्द्रता, नेत्राची स्निग्धता त्वचा, लसीकारस्थानें, स्वेद, मूत्र, पूरीष यांची दर्शनादींनी सर्व प्रकारें परीक्षा करावी. शुष्कता, स्त्राव, उत्सेध, अल्पत्व, द्रवता हे भाव पाहावेत. त्वचेखालीं ग्रंथीच्या स्वरुपाची विकृती असूं शकते. स्पर्शनानें पीडनानें ती जाणून घ्यावी. तृषा आणि मूत्रप्रवृत्ति यासंबधींचें ज्ञान आवश्यक आहे.

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP