मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ८

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


सच्चिदात्मन्यनुस्यूते नित्ये विष्णौ प्रकल्पिता: ।
व्यक्तयो विविधा: सर्वा हाटके कटकादिवत् ॥८॥

नित्य विष्णु सच्चिदानंद । जो जगदांकूर आणि कंद । स्थावर जंगमादि व्यक्ती विविध । आपुणचि आवघा व्यापला ॥९५॥
मानव देव यक्ष किन्नर । भूत पिशाच्च विद्याधर । तिर्यड् योनि वृक्ष गिरिवर । अनस्यूत आत्मा सर्वत्रिं ॥९६॥
जैसि मृत्तिका अनस्यूत घटासि । कीं अनस्यूत तंतु पटासि । किं सुवर्ण सर्व अळंकारासि । अनस्यूत असे पैं ॥९७॥
तैसा आत्मा व्यक्तीमात्रातें । अदिमध्य अवसानिं वर्ते । परंतु अज्ञानें कल्पी तया जगातें । भाविले विविध ॥९८॥
तूं जरि ह्मणशील ऐसें । किं हें जग कोण्हि कल्पिलें असें । तरी तें सांगतों विन्यासें । ऐकोनि घेइ ॥९९॥
ईश्वरें मायावसें जग कल्पिलें । तें जीवें अविद्यावसें सत्य मानिलें । ऐसें उभयांनिं मिळोनि कल्पिलें । हें जग सर्व ॥१००॥
जैसें मृत्तिकेचिया ठाईं । कुल्लाळें घट कल्पिला पाहि । तो ग्राहिकें सत्य मानोनि लवलाहि । मोलें घेतला ॥१०१॥
कां सुवर्णाचि कटक कुंडलें । सोनारें स्व बुद्धिनें कल्पिले । परी ते ग्राहिकें ग्रहण केले । अळंकार सत्य म्हणोनि ॥१०२॥
किं अडवें उभे तंतु घालून । साळियें पट केला कल्पुन । तो ग्राहिकें सत्यत्वें मानुन । विकत घेतला ॥१०३॥
साळी सोनार कुंभार । यातें ठावें कार्यकारणप्रकार । अज्ञानि ग्राहीक कार्यावर । द्रिष्टि ठेउनि घेती पैं ॥१०४॥
तसा इश्वर आत्मा आणि जग जाणे । त्यास्तव आत्मा सत्य जग कल्पीत म्हणे । जीव येकले जग मात्र जाणे । यास्तव म्हणे सत्य पैं ॥१०५॥
ऐसे हे व्यक्तिमात्र सर्वही । आत्म स्वरूपि कल्पीत पाहि । जैसे मृत्तिका - तंतु - सुवर्णा ठाइं । घटपट अळंकार कल्पित पैं ॥१०६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP