मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
आपल्या नाडीचे ठोके

आपल्या नाडीचे ठोके

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- सांगितलेस खरे... पण त्यांचे काही समाधान झालेले दिसले नाही.
- नाहीच व्हायचे ! अरे त्यांचे एकाचेच काय, पण पुष्कळांचे होत नाही !
- कारण ?
- बरोबरच आहे ! लढाई युरोपखंडात, आणि तीही परराष्ट्रात. आपला - म्हणजे हिंदुस्थानाचा अर्थाअर्थी काय संबंध आहे ?
- तसा काही नाही म्हणा...
- मग उगीच वाटाघाट का ? ‘ अमक्याचा पराभव झाला अन् तमक्याचा जय झाला ! ’ करायचे आहे काय आपल्याला त्याच्याशी ! कारण लभ्यांशाच्या नावाने तर...
- दिसतेच आहे !
- पण... या बाबतीत लभ्यांशाकडेच निवळ जगाची दृष्टी नाही आहे ! वेगवेगळ्या राष्ट्रांचा प्रश्न नाही आहे हा...
- मग ?
- नेपोलियनप्रमाणे... यावेळीही मनुष्यत्वाला धाडकन् कोसळून पडावे लागते की काय ?... इकडे खरोखर दृष्टी आहे
- अन् पडावे लागले तर ?
- तर ! याहीपेक्षा जोराचे पुन्हा प्रयन्त होतील !
- पण हे असे कुठपर्यंत ?
- कुठपर्यंत म्हणजे ! ध्येयाला हात घालीपर्यंत !
- क्च् ! एकंदरीत... आपण.. फार मोठ्या काळात जन्माला आलो आहोत तर !!
- यात काय संशय ! कायसर विइलयमच्या नाडीच्या ठोक्याबरोबर... आपल्याही नाडीचे ठोके पडत आहेत ! ही काय... कमी भाग्याची गोष्ट आहे ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP