राग - तिलक कामोद

श्रीपांडुरंगा हे जगदीशा ॥
पुरवावी माझी अंतिम मनीषा ॥धृ॥
अति उत्कंठीत जीवनीं आशा ॥
तव दर्शनाची असे कमलाक्षा ॥१॥
सुंदर रमणीय तव मुखचंद्रमा ॥
दावी मज दीनेसी पुरुषोत्तमा ॥२॥
आळविता तुज देवा कंठ शोषला ॥
अजुनी दया नये का तुजला ॥३॥
दीनदयाळु अनाथ नाथा ॥
भावे दासी ठेवी चरणीं माथा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP