अभंग २९

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग -गारा
चाल : ‘ आनबान जियामें ’

शाम सुंदर हरी जसा ऊभा पुढे राहिला ॥
भान रहित होऊनी पाहता राहीले हरीमुखा ॥धृ॥
मग कोमल त्या चरणावरी दंडवत घातला ॥
अती आनंदाने दृढ धरीले हरीचरणाला ॥१॥
त्याक्षणी मधुर बोल कानी माझ्या पडला ॥
भक्तिप्रेमाच्या हांकेने इथे आणिले मला ॥२॥
काय तव इच्छा ती सांग झणी मला ॥
तुमच्याविणे प्रभुराया कांही नलगे मला ॥३॥
अखंड सहवास तुमचा लाभो मजला ॥
तुमच्या चरणी ठाव द्यावा झणी दासीला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP