मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णलीला| अभंग ४२ ते ४५ श्रीकृष्णलीला अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४१ अभंग ४२ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५४ श्रीकृष्णलीला - अभंग ४२ ते ४५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ४२ ते ४५ Translation - भाषांतर ४२.मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे ॥१॥शिंगें पावे मोहर्या वाजती कुसरी । हुंबर आखरी गगन गर्जे ॥२॥मोतियांचे घोंस चांदवे झळकती । कनक दंड ढाळिती रामकृष्ण ॥३॥गौरज डौरळा पीतांबार भिनला । स्वेद जो दाटला मुख कमळीं ॥४॥रुळती वनमाळा कंठीं गुंजाहार । तरू घोंस अपार खोविलें शिरीं ॥५॥गजगती पाउलें ठेविती भूमीवरी । धन्य ते संसारी डोळे देती ॥६॥कुंकुम केशर रंगलें रातोत्पळ । ध्वज वज्रां-कुश कमळ उर्ध्व रेखा ॥७॥विमानें आकाशीं झालीं पै सकळ । धन्य तें गोकुळ म्हणती देवा ॥८॥देव पुष्पवृष्टी करिती कृष्णावरी । अंबर जयजयकारी गर्जतसे ॥९॥माडिया गोपुरीं पाहती सुंदरी । यशोदेच्या करीं लिंबलोण ॥१०॥ओंवाळिला नाम्या शिंप्याचा दातार । रखुमादेवीवर श्रीविठ्ठला ॥११॥४३.खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागें ॥१॥यमुने पाबळीं गोपां पाचारीत । सिदोर्या शोभत पाठीवरी ॥२॥अंतीं पंक्ति करी त्या गोपाळांच्या । संगें गोविंद त्यांच्या अखंडित ॥३॥नामा म्हणे बोनें विटों देऊं नका । वैकुंठ-नायका सांभाळावें ॥४॥४४.श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें ॥१॥पैं सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडें खांदा मोठा ॥२॥थिरू वांसरें होकरी । पुढें वाहती पावे मोहरी ॥३॥हातीं घेऊनि वेताटी । कैसा लागे वासुरा पाठीं ॥४॥बाळांगोपाळांसहित मुरारी । खेळू खेळे नानापरी ॥५॥विष्णुदास नामयाचा दातारु । ब्रह्मादिकां त्याचा नकळे पारु ॥६॥४५.गोवळे ह्मणती कांहो आह्मां भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी ॥१॥गाई तृप्त करी कळबाच्या तळीं । सोडिल्या शि-दोरी दावितसे ॥२॥हमामा घालितां नव्हती माघारें । नाहीं भीत पोरें येत संगें ॥३॥नामा म्हणे काय भिऊनि राहिले । नि-वांतचि ठेले ब्रह्मदिक ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP