मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
मासिकें

तृतीय परिच्छेद - मासिकें

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां मासिकें सांगतो -

अथमासिकानि तानिचकृत्वैवसपिंडनंकार्यं तथागोभिललौगाक्षी श्राद्धानिषोडशादत्वानैवकुर्यात्सपिंडनं श्राद्धानिषोडशापाद्यविदधीतसपिंडनं तानित्वाह जातूकर्ण्यः द्वादशप्रतिमास्यानिआद्यंषाण्मासिकंतथा त्रैपक्षिकाब्दिकेचेतिश्राद्धान्येतानिषोडश आद्यषाण्मासिकाब्दिकशब्दाः ऊनमासिकोनषष्ठोनाब्दिकपराः हेमाद्रौतुसपिंडीकरणंचैवइत्येतत् श्राद्धषोडशमित्युत्तरार्धेपाठः तदा आद्यमूनमासिकंद्वादशाहे षाण्मासिकंऊनषष्ठोनाब्दिकेइत्यर्थः कात्यायनस्त्वन्यथाह द्वादशप्रतिमास्यानिआद्यंषाण्मासिकेतथा सपिंडीकरणंचैवइत्येतच्छ्राद्धषोडशम् एकाहेनतुषण्मासायदास्युरपिवात्रिभिः न्यूनः संवत्सरश्चैवस्यातांषाण्मासिकेतदा द्विवचनादूनषष्ठोनाब्दिकेइत्यर्थमाहपृथ्वीचंद्रः व्यासस्त्वन्यथाह द्वादशाहेत्रिपक्षेचषण्मासेमासिकाब्दिके श्राद्धानिषोडशैतानिसंस्मृतानिमनीषिभिः द्वादशाहपदमूनमासिकपरं तस्यद्वादशाहेप्युक्तेरिति कालादर्शः मदनरत्नेब्राह्मेत्वन्यथोक्तं नृणांतुत्यक्तदेहानांश्राद्धाः षोडशसर्वदा चतुर्थेपंचमेचैवनवमैकादशेतथा ततोद्वादशभिर्मासैः श्राद्धाद्वादशसंख्ययेति चतुर्थादीनिदिनानि भविष्येत्वन्यथोक्तं अस्थिसंचयनंश्राद्धंत्रिपक्षेमासिकानितु रिक्तयोश्चतथातिथ्योः प्रेतश्राद्धानिषोडशेतिरिक्तयोस्तिथ्योरित्यूनषष्ठोनाब्दिकपरमितिहेमाद्रिः अत्रदेशकुलशाखाभेदाव्द्यवस्थेतिसर्वनिबंधाः गालवः ऊनषाण्मासिकंषष्ठेमासेवाप्यूनमासिकं त्रैपक्षिकंत्रिपक्षेस्यादूनाब्दंद्वादशेतथा ऊनमासिकेतुगोभिलः मरणाद्दादशाहेस्यान्मास्यूनेवोनमासिकं मदनरत्नेकालादर्शेच श्लोकगौतमः एकद्वित्रिदिनैरुनेत्रिभागेनोनएववा श्राद्धान्यूनाब्दिकादीनिकुर्यादित्याहगौतमः क्रियानिबंधेक्रतुस्तु सार्धएकादशेमासेसार्धेवैपंचमेतथा ऊनाब्दमूनषण्मासंभवेतांश्राद्धकर्मणीत्युक्तं तत्रमूलंचिंत्यम् ।

तीं मासिकें करुनच सपिंडन करावें . तेंच सांगतात गोभिल लौगाक्षि - ‘ षोडश श्राद्धें ( मासिकें ) केल्यावांचून सपिंडीकरण करुं नयेच . षोडश श्राद्धें करुन नंतर सपिंडीकरण करावें . " तीं षोडश मासिकें सांगतो जातूकर्ण्य - " बारा महिन्यांचीं बारा , ऊनमासिक , ऊनषाण्मासिक , त्रैपक्षिक आणि ऊनाब्दिक अशीं हीं सारीं मिळून सोळा श्राद्धें होतात . " या वचनांत ‘ आद्यं ’ ह्म० ऊनमासिक . ‘ षाण्मासिक ’ ह्म० ऊनषष्ठमासिक . ‘ आब्दिक ’ ह्म० ‘ ऊनाब्दिक ’ असें समजावें . हेमाद्रींत तर - वरील जातूकर्ण्यवचनाच्या उत्तरार्धांत ‘ सपिंडीकरणं चैव इत्येतच्छ्राद्धषोडशम् ’ असा पाठ आहे . त्यावेळीं आद्य ह्म० ऊनमासिक तें बाराव्या दिवशीं करावें . आणि षाण्मासिक म्हणजे ऊनषष्ठ व ऊनाब्दिक होय . कात्यायन तर निराळें सांगतो - " प्रत्येक महिन्याचीं बारा , आद्यमासिक , षाण्मासिकें , सपिंडीकरण हीं सोळा श्राद्धें होतात . सहा महिने एक दिवसानें किंवी तीन दिवसांनीं होणारे असतील तेव्हां आणि संवत्सर एक दिवसानें किंवा तीन दिवसांनीं न्यून असेल तेव्हां तीं षाण्मासिक श्राद्धें होतात . " या वचनांत ‘ षाण्मासिके ’ असें द्विवचन असल्यामुळें ऊनषष्ठ आणि ऊनाब्दिक हीं दोन समजावीं , असा अर्थ सांगतो पृथ्वीचंद्र . व्यास तर वेगळेंच सांगतो - " बाराव्या दिवशीं , तीन पक्ष होतील त्या दिवशीं , साहाव्या मासांत , बारामासांत होणारीं आणि आब्दिक हीं सोळा श्राद्धें विद्वानांनीं सांगितलीं आहेत . " या वचनांत ‘ द्वादशाहे ’ असें पद आहे , त्यानें त्या दिवशीं होणारें ऊनमासिक समजावें . कारण , ऊनमासिक बाराव्या दिवशीं देखील सांगितलें आहे , असें कालादर्श सांगतो . मदनरत्नांत ब्राह्मांत तर दुसर्‍या रीतीनें सांगितलें आहे - " मृत झालेल्या मनुष्याचीं षोडश श्राद्धें सर्वदा करावीं . तीं अशीं - चवथ्या दिवशीं , पांचव्या , नवव्या , अकराव्या दिवशीं हीं चार होतात . आणि तदनंतर बारा महिन्यांचीं बारा श्राद्धें होतात . " भविष्यांत तर निराळेंच सांगितलें आहे - " अस्थिसंचयनश्राद्ध , त्रैपक्षिक , मासिकें , आणि रिक्त म्हणजे न्यून तिथींना दोन , अशीं प्रेतश्राद्धें सोळा होतात . " रिक्त तिथींना म्हणजे ऊनषष्ठ आणि ऊनाब्दिक समजावीं , असें हेमाद्रि सांगतो . असे षोडशश्राद्धांविषयीं मतभेद आहेत त्यांची व्यवस्था देशाचार , कुलाचार व शाखाभेद यांवरुन करावी , असें सारे निबंधकार सांगतात . गालव - " ऊनषाण्मासिक सहाव्या मासांत , ऊनमासिक पहिल्या मासांत , त्रैपक्षिक तीन पक्षांचे ठायीं , आणि ऊनाब्दिक बाराव्या मासांत , अशीं होतात . " ऊनमासिकाविषयीं तर सांगतो गोभिल - " मरणदिवसापासून बाराव्या दिवशीं किंवा मास पूर्ण झाला नसतां ऊनमासिक करावें . " मदनरत्नांत व कालादर्शांत श्लोकगौतम - " पहिला महिना एक दिवसानें किंवा दोन दिवसांनीं अथवा तीन दिवसांनीं न्यून असतां ऊनमासिक करावें . असेंच सहावा मास एक , दोन किंवा तीन दिवसांनीं न्यून असतां ऊनषाण्मासिक करावें . तसेंच बारावा मास एक , दोन किंवा तीन दिवसांनीं न्यून असतां ऊनाब्दिक करावें . अथवा त्या त्या मासाच्या त्रिभागानें तो तो महिना न्यून असतां तें तें करावें , असें गौतम सांगतो . " क्रियानिबंधांत , क्रतु तर - " साडे अकरा महिन्यांनीं ऊनाब्दिक होतें . आणि साडे पांचमहिन्यांनीं ऊनषाण्मासिक होतें " असें सांगतो , असें सांगितलें , त्याविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे .

ऊनेषुवर्ज्यान्याहमरीचिः द्विपुष्करेचनंदासुसिनीवाल्यांभृगोर्दिने चतुर्दश्यांचनोनानिकृत्तिकासुत्रिपुष्करे ज्योतिषे त्रिपादर्क्षंतिथिर्भद्राभौमेज्यरविभिः सह तदात्रिपुष्करोयोगोद्वयोर्योगेद्विपुष्करः गालवः त्रिभिर्वादिवसैरुनेत्वेकेनद्वितयेनवा आद्यादिषुचमासेषुकुर्यादूनाब्दिकादिकम् एकन्यूनपक्षेपंचम्यांमृतस्यतृतीयायांत्रिभिर्न्यूनेप्रतिपदिव्द्यूनेद्वितीयायामितिकेचित् माधवस्तु षाण्मासिकाब्दिकेश्राद्धेस्यातांपूर्वेद्युरेवते मासिकानिस्वकीयेतुदिवसेद्वादशेपिवेतिपैठीनसिवाक्येऊनषण्मासिकंसप्तममासगतमृताहात्पूर्वेद्युः कार्यं ऊनाब्दिकंतुद्वितीयाब्देमृताहदिनात्पूर्वेद्युः कार्यमित्यर्थमाह पुर्वेद्युर्मृताहादित्यर्थः मासिकानिस्वकीयेतुदिवसेइत्युक्तेः इदमेवयुक्तं मदनरत्नेप्येवं याज्ञवल्क्यः मृतेहनितुकर्तव्यंप्रतिमासंतुवत्सरं प्रतिसंवत्सरंचैवमाद्यमेकादशेहनि अत्राद्यमासिकमाब्दिकंचैकादशेह्नीति निर्णयामृतादयः ब्राह्मणंभोजयेदाद्येहोतव्यमनलेथवा पुनश्चभोजयेद्विप्रंद्विरावृत्तिर्भवेदितीतिगोभिलीयंचतद्विषयमाहुः अन्येतुमासपक्षतिथिस्पष्ठेइत्यादिविरोधादाब्दिकंवर्षांतेएव मासिकंतुमासादौ द्विरावृत्तिस्तुएकादशाहिकाद्यमासिकपरा देवयाज्ञिकोप्येवमाह्ह लौगाक्षिरपि मासादौमासिकंकार्यमाब्दिकंवत्सरेगते आद्यमेकादशेकार्यमधिकेत्वधिकंभवेत् दीपिकायांतु आद्यंरुद्रमितेर्कसंमितदिनेवास्यादित्युक्तं गौडास्तुमृततिथ्यवधिकेएकदिनाधिके माससंवत्सरपदंगौणं पूर्णेब्देइतिईषदसमाप्तपरत्वमितिशूलपाणिः तेनद्वितीयादिमासादावाद्यमासिकादिति तन्मौर्ख्यकृतं ।

ऊनमासिक , ऊनषाण्मासिक व ऊनाब्दिक यांविषयीं वर्ज्य सांगतो मरीचि - " द्विपुष्करयोग , नंदातिथि ( १।६।११ ), चतुर्दशीयुक्त अमावास्या , भृगुवार , चतुर्दशी , कृत्तिकानक्षत्र , आणि त्रिपुष्करयोग यांचे ठायीं ऊन श्राद्धें करुं नयेत . " त्रिपुष्कर व द्विपुष्कर योग यांचें लक्षण - ज्योतिषांत - " त्रिपाद नक्षत्र , भद्रा तिथि ( २।७।१२ ) आणि भौम , गुरु ; रवि हे वार यांपैकीं तिथि , वार , नक्षत्र या तिघांचा योग असतां त्रिपुष्कर योग होतो . आणि दोघांचा योग असतां द्विपुष्कर योग होतो . " गालव - " प्रथम मास , सहावा मास , व बारावा मास हे , तीन दिवसांनीं किंवा दोन दिवसांनीं अथवा एक दिवसानें न्यून असतां अनुक्रमें ऊनषाण्मासिक व ऊनाब्दिक होतात . " हीं एक दिवसानें न्यून असतां ह्या पक्षीं पंचमीस मृताचें तृतीयेस ऊनमासिकादि होतें . तीन दिवसांनीं न्यून असतां ह्यापक्षीं पंचमीस मृताचें प्रतिपदेस ऊनमासिकादि श्राद्ध . आणि दोन दिवसांनी न्यून असतां ह्या पक्षीं पंचमीस मृताचे द्वितीयेस ऊनमासिकादि होतें , असें केचित् विद्वान् सांगतात . माधव तर - " ऊनषाण्मासिक आणि ऊनाब्दिक हीं श्राद्धें पूर्व दिवशींच होतात . आणि इतर मासिकें आपापल्या दिवशीं किंवा बाराव्या दिवशीं होतात . " ह्या पैठीनसिवाक्याचा - ऊनषाण्मासिक सातव्या मासाच्या मृत तिथीच्या पूर्व दिवशीं करावें . ऊनाब्दिक दुसर्‍या वर्षाच्या मृतदिवसाच्या पूर्वदिवशीं करावें , असा अर्थ सांगतो . पूर्वदिवशीं म्हणजे मृतदिवसाच्या पूर्व दिवशीं समजावें . कारण , मासिकें आपापल्या दिवशीं ( मृतदिवशीं ) करावीं ; असें सांगितलें आहे . अर्थात् पुर्वेद्यु म्हणजे त्याच्या पूर्व दिवशीं समजावें . हेंच युक्त आहे . मदनरत्नांतही असेंच आहे . याज्ञवल्क्य - " संवत्सरपर्यंत प्रत्येक मासीं मृतदिवशीं करावें . याप्रमाणें प्रत्येक वर्षीं मृतदिवशीं करावें . आणि आद्य अकराव्या दिवशीं करावें . " या ठिकाणीं आद्य मासिक आणि आब्दिक अकराव्या दिवशीं , असा अर्थ निर्णयामृत इत्यादिक ग्रंथकार सांगतात . आणि " आद्यश्राद्धांत ब्राह्मणाला भोजन घालावें किंवा श्राद्धान्नाचा अग्नींत होम करावा . पुनः दुसर्‍या ब्राह्मणाला भोजन घालावें , याप्रमाणें येथें श्राद्धाची द्विरावृत्ति होते . " हें गोभिलाचें वचन याविषयींच ते ( निर्णयामृतादिक ) सांगतात . इतर ग्रंथकार तर - " मास , पक्ष , तिथि यांनीं स्पष्ट केलेल्या ज्या दिवशीं जो मृत असेल त्याचा तो क्षयदिवस आहे , त्या दिवशीं करावें " ह्या व्यासादिवचनाचा विरोध असल्यामुळें आब्दिक श्राद्ध वर्षांतींच करावें . मासिक तर मासाच्या आद्यतिथीस करावें . वरील गोभिलवचनांत द्विरावृत्ति सांगितली ती एकादशाहिक व आद्यमासिक यांविषयीं समजावी . देवयाज्ञिकही असेंच सांगतो . लौगाक्षिही - " मासाच्या आरंभीं मासिक करावें . आणि संवत्सर गेल्यावर आब्दिक करावें . आद्य अकराव्या दिवशीं करावें . अधिक मासांत अधिक होतें . " दीपिकेंत तर - " आद्य अकराव्या दिवशीं किंवा बाराव्या दिवशीं होतें " असें सांगितलें आहे . गौड तर - मृततिथीपासून पुढच्या मासाच्या मृततिथीपर्यंत एक मास व एक दिवस होतो . एका दिवसानें अधिक मासाला मास शब्द गौण ( लाक्षणिक ) आहे . याप्रमाणें दुसर्‍या वर्षाच्या मृततिथीपर्यंत एक वर्ष व एक दिवस होतो त्या ठिकाणींही संवत्सर पद गौण आहे . ‘ पूर्ण अब्द असतां ’ असें जें वाक्य तें किंचिन्न्यून वर्षबोधक आहे , असें शूलपाणि सांगतो . तेणेंकरुन दुसर्‍या वगैरे मासाच्या आधीं ( पूर्वदिवशीं ) आद्यमासिक वगैरे होतात . तें म्हणणें मूर्खपणाचें आहे .

अशक्तौतुहारीतः मुख्यंश्राद्धंमासिमासिअपर्याप्तावृतुंप्रति द्वादशाहेनवाभोज्याएकाहेद्वादशापिवा ऋतुंप्रतिद्वेद्वेइत्यर्थः यदापितुर्मरणात्रयोविशंतितमेदिनेदर्शोवृद्धिर्वास्यात्तदाद्वादशदिनेषुद्वादशमासिकानिकार्याणीत्यर्थः त्रैपक्षिकंतुपक्षेतीतेमृताहेकार्यं त्रैपक्षिकंभवेद्वृत्तेत्रिपक्षेतदनंतरमितिभविष्योक्तेरितिमदनरत्ने उक्तं पृथ्वीचंद्रकालादर्शनिर्णयामृतादयस्तु ऊनान्यूनेषुमासेषुविषमाहेसमेपिवा त्रैपक्षिकंत्रिपक्षेस्यान्मृताहेत्वितराणित्विति कार्ष्णाजिनिस्मृतेः पूर्वत्रवृत्तेप्रवृत्तेइत्यर्थमाहुः तेतदनंतरशब्दविरोधात्र्त्रैपक्षिकद्वितीयमासिकयोः संकरापत्तेरेवंव्याख्यायांमानाभावाच्चोपेक्ष्याः त्रिपक्षसपिंडनेत्वेवंशब्दाभावादधिकरणत्वमेवज्ञेयं यत्तुक्रियानिबंधेगारुडे त्रैपक्षिकंत्रिपक्षेतुप्रवृत्तेविषमेदिने मासिकान्यपिचोनानिअष्टा विंशतिमेदिनेइति तन्निर्मूलम् ।

प्रतिमासीं करण्याला शक्ति नसेल तर सांगतो हारीत - " महिन्यामहिन्याला श्राद्ध मुख्य आहे , म्हणजे प्रत्येक ऋतूला दोन दोन श्राद्धें पडतात ; तीं करण्याविषयीं अशक्ति असेल तर बाराव्या दिवसापासून तेविसावे दिवसापर्यंत दररोज एकेक श्राद्ध करावें . अथवा एक दिवशीं बारा ब्राह्मणांना भोजन घालावें . " याचा अर्थ - ज्या वेळीं पित्याचे मरणदिवसापासून तेविसाव्या दिवशीं दर्श किंवा वृद्धि श्राद्ध असेल त्या वेळीं बारा दिवस बारा मासिकें करावीं , असा आहे . त्रैपक्षिक तर तीन पक्ष झाल्यावर मृतदिवशीं करावें . कारण , " तिसरा पक्ष झाला असतां तदनंतर त्रैपक्षिक होतें " असें भविष्यवचन आहे , असें मदनरत्नांत उक्त आहे . पृथ्वीचंद्र , कालादर्श , निर्णयामृत इत्यादिक तर - " ऊनश्राद्धें ऊनमासांचेठायीं विषम दिवशीं किंवा सम दिवशीं होतात . त्रैपक्षिक तिसर्‍या पक्षांत होतें . इतर मासिकें मृतदिवशीं होतात . " ह्या कार्ष्णाजिनि स्मृतीवरुन वरील भविष्यवचनांत ‘ तिसरा पक्ष वृत्त म्हणजे प्रवृत्त असतां ’ असा अर्थ करितात . त्यांच्या त्या अर्थाला त्याच भविष्यवचनांतील ‘ तदनंतर ’ या शब्दाचा विरोध येत असल्यामुळें ; आणि तसा अर्थ केला असतां त्रैपक्षिक आणि द्वितीयमासिक यांचा काल एक असल्याकारणानें संकर प्राप्त झाल्यामुळें ; आणि अशी व्याख्या करण्याविषयीं प्रमाण नसल्यामुळेंही त्यांची व्याख्या उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . तिसर्‍या पक्षांत सपिंडन करावें . असें सपिंडीकरणप्रकरणीयवचन आहे त्या ठिकाणीं तर ‘ तदनंतर ’ अशा अर्थाचा शब्द नसल्यामुळें ‘ तिसर्‍या पक्षांत ’ असाच अर्थ समजावा . आतां जें क्रियानिबंधांत गारुडांत - " त्रिपक्ष प्रवृत्त असतां विषम दिवशीं त्रैपक्षिक होतें . मासिकें आणि ऊनश्राद्धें हीं अठ्ठविसाव्या दिवशीं होतात " असें वचन , तें निर्मूल आहे .

स्मृतिरत्नावल्यां द्वादशाहेयदाकुर्यात्पितु पुत्रः सपिंडनं एकादशेह्निकुर्वीतप्रेतश्राद्धानिषोडश पैठीनसिः सपिंडीकरणादर्वाक्कुर्वन् श्राद्धानिषोडश एकोद्दिष्टविधानेनकुर्यात्सर्वाणितानितु सपिंडीकरणादूर्ध्वं यदाकुर्यात्तदापुनः प्रत्यब्दंयोयथाकुर्यात्तथाकुर्यात्सतान्यपि मदनरत्नेकात्यायनः श्राद्धमग्निमतः कार्यं दाहादेकादशेहनि ध्रुवाणितुप्रकुर्वीतप्रमीताहनिसर्वदा ध्रुवाणित्रैपक्षिकादूर्ध्वानि क्रियानिबंधेगारुडे त्रिपक्षात्पूर्वतः साग्नेर्भवेत्संस्कारवासरे ऊर्ध्वंमृतदिनेनग्नेः सर्वाण्येवमृताहतः एतानिचयदासपिंडनात्पूर्वंयुगपत्कुर्यात्तदादेशकालकर्त्रैक्येतंत्रत्वादेकः पाकइतिकेचित् पाकभेदइतिभट्टचरणाः अत्रकेचिदाहुः देशकालकर्तृदैवतैक्येतंत्रत्वात् श्राद्धकालातिक्रमापत्तेर्द्वादशाहेथसर्वाणिसंक्षेपेणसमापयेत् तान्येवतुपुनः कुर्यात्प्रेतशब्दंनकारयेत् इतिकात्यायनोक्तेर्नैकः श्राद्धद्वयंकुर्यात् समानेहनिकुत्रचिदित्यस्यदैवतैक्यपरत्वेप्यत्रतत्सत्त्वात् श्राद्धंकृत्वातुतस्यैवपुनः श्राद्धंनकारयेदितिजाबाल्युक्तेः षोडशसंख्यायाश्चवाजपेयेप्राजापत्ययागसप्तदशत्ववत्सान्नाय्ययागद्वित्ववच्चदर्शपातसंक्रांतिश्राद्धवत् युगपदनुष्ठानेप्युपपत्तेराद्यमासिकाद्यूनाब्दिकांतेषुषोडशश्राद्धेषुक्षणः क्रियतामित्येवंप्रयोगेणैकोविप्रः पिंडोर्घ्यश्चेति विरुद्धविधिविध्वंसेप्येवं तन्मंदं द्वादशाहेनवाभोज्याएकाहेद्वादशापिवेतिहेमाद्रौहारीतवचोविरोधात् तेनविप्रभेदात्पिण्डार्घ्याद्यपिभिन्नमितिसिद्धम् ।

स्मृतिरत्नावलींत - " ज्या वेळीं पुत्र पित्याचें सपिंडन बाराव्या दिवशीं करील त्या वेळीं सोळा प्रेतश्राद्धें ( मासिकें ) अकराव्या दिवशीं त्यानें करावीं . " पैठीनसि - " सपिंडीकरणाच्या पूर्वीं सोळा श्राद्धें करीत असतां तीं सारीं एकोद्दिष्टविधीनें करावीं . ज्या वेळीं सपिंडीकरणानंतर पुनः करील त्या वेळीं तीं श्राद्धें जसें प्रतिसांवत्सरिक करावयाचें तशीं करावीं . " मदनरत्नांत कात्यायन - " अग्निमान् जो असेल त्याचें श्राद्ध दाहदिवसापासून अकराव्या दिवशीं करावें . त्रैपक्षिकाच्या पुढचीं श्राद्धें सर्वदा मृतदिवशीं करावीं . " क्रियानिबंधांत गारुडांत - " साग्निकाचें त्रैपक्षिकाचे पूर्वींचें श्राद्ध संस्कार ( दाह ) दिवशीं होतें . आणि त्रैपक्षिकाच्या पुढचें श्राद्ध मृतदिवशीं होतें . अनग्निकाचीं सारींच श्राद्धें मृतदिवशीं होतात . " हीं श्राद्धें ज्या वेळीं सपिंडीच्या पूर्वीं एकदम करील त्या वेळीं देश , काल व कर्ता एक असतां तंत्र होत असल्यामुळें एक पाक करावा , असें केचित् विद्वान् सांगतात . पाकभेद करावा , असें भट्टचरण ( नारायणभट्ट ) सांगतात . येथें केचित् ग्रंथकार असें सांगतात कीं ; देश , काल , कर्ता व देवता हीं एक असलीं म्हणजे तंत्र होत आहे ; एक दिवशीं न केलीं तर श्राद्धकालांचा अतिक्रम होत आहे ; " बाराव्या दिवशीं सारीं श्राद्धें संक्षेपानें समाप्त करावीं . व तींच श्राद्धें पुनः करावीं , त्या वेळीं प्रेतशब्दाचा उच्चार करुं नये " ह्या कात्यायनवचनानें एक दिवशीं करण्यास सांगितलीं आहेत ; " एकानें एक दिवशीं कधींही दोन श्राद्धें करुं नयेत " हें निषेधक वचन एक देवतेच्या श्राद्धाविषयीं असलें तरी या ठिकाणीं अनेकांची एक देवता असल्यामुळें तो निषेध येत आहे ; " एक वेळां श्राद्ध करुन पुनः त्याचेंच श्राद्ध करुं नये " ह्या जाबालिवचनानें एकवार करुन नंतर त्या दिवशीं करण्याचा निषेध केला आहे ; ह्या वरील सर्व वचनावरुन एक दिवशीं तंत्रानें करावीं , असें होत आहे . आतां षोडश ( सोळा ) संख्येची उपपत्ति कशी ? असें म्हणाल तर , वाजपेय यज्ञांत ‘ सप्तदश प्राजापत्यान् पशून् आलभेत ’ असें श्रुतिवचन आहे . म्हणजे सतरा प्रजापतिदेवताक पशूंचे याग करावे . या ठिकाणीं जशी सतरा ह्या संख्येची उपपत्ति होते तशी ; आणि सान्नाय हवीचे याग दोन करावे , या ठिकाणीं दोन संख्येची उपपत्ति होते तशी ; व दर्श , व्यतीपात आणि संक्रांति एक दिवशीं प्राप्त असतां तीन श्राद्धांचें एकदम अनुष्ठान जसें होतें तशी एकदम अनुष्ठानानें सोळा श्राद्धांची उपपत्ति होत आहे म्हणून , ‘ आद्यमासिकाद्यूनाब्दिकांतेषु षोडशश्राद्धेषु क्षणः क्रियतां ’ अशा प्रयोगानें श्राद्धें करावीं . त्यांत एक ब्राह्मण असावा , एक पिंड व एक अर्घ्य द्यावा , असें सांगतात . विरुद्धविधिविध्वंसग्रंथांतही असेंच आहे . हें सांगणें मंद आहे . कारण , यांनीं एक ब्राह्मण वगैरे सांगितला आहे त्याला " बारा दिवस बारा ब्राह्मणांना भोजन घालावें , किंवा एक दिवशीं बारा ब्राह्मणांना भोजन घालावें " असें वर सांगितलेल्या हेमाद्रींतील हारीतवचनाशीं विरोध येतो . या वचनावरुन ब्राह्मण अनेक असल्यामुळें पिंड , अर्घ्य इत्यादिकही अनेक होतात , असें सिद्ध झालें आहे .

एतानिद्वादशाहादौसपिंडनात्पूर्वंकृतान्यपिवृद्धिंविनापकर्षेपुनः स्वकालेकार्याणि यस्यसंवत्सरादर्वाक्सपिंडीकरणंकृतं मासिकंचोदकुंभंचदेयंतस्यापिवत्सरमितिमदनरत्नेंऽगिरसोक्तेः नचेदंमासिकानामपकर्षंविधत्ते किंतुसपिंडनोर्ध्वंस्वकालेनुष्ठानमेवेतिवाच्यं श्राद्धानिषोडशादत्वानतुकुर्यात्सपिंडतामितिविरोधात् यस्यसंवत्सरादर्वाक् विहितातुसपिंडता विधिवत्तानिकुर्वीतपुनः श्राद्धानिषोडशेतिमाधवीयेगोभिलोक्तेश्च अर्वाक्संवत्सराद्यस्यसपिंडीकरणंकृतं षोडशानांद्विरावृत्तिंकुर्यादित्याहगौतमइतितत्रैवगालवोक्तेः षोडशत्वंचैकादशाहसपिंडनपक्षे तत्राद्यमासिकस्यकालसत्त्वात् अन्यपक्षेषुयथासंभवंज्ञेयं यत्तुदीपिकायाम् अनुमासिकानितुचरेत्तान्येवसापिंड्यतः पश्चाद्दादशेत्युक्तेरुनानांनपुनः कृतिरित्युक्तं तदेतद्विरोधाच्चिंत्यम् यत्तुगौडाः सपिंडीकरणांतातुज्ञेयाप्रेतक्रियाबुधैरितिशातातपोक्तेर्मासिकानांप्रेतत्वविमोक्षार्थत्वात्सपिंडनापकर्षेतदंतन्यायेनतेषामप्यपकर्षान्मासिकानांनपुनः कृतिः यत्तु मासिकंचोदकुंभंचेतिलौगाक्ष्यादिवचनं तन्निर्मूलं समूलत्वेपिदार्शपरंचेत्याहुः तेउक्तवक्ष्यमाणवचोनिबंधविरोधान्मूर्खाइत्युपेक्ष्याः यत्तुमिताक्षरायांसपिंडनोर्ध्वंस्वकालेएवकार्याणि अपकर्षस्त्वनुकल्पइत्युक्तं तदपिपूर्वविरोधाच्चिंत्यं तेनवृद्धिंविनापकर्षे पुनः कृतिः अर्वाक्संवत्सराद्यस्यसपिंडीकरणंभवेत् प्रेतत्वमिहतस्यापिज्ञेयंसंवत्सरंनृपेत्यग्निपुराणात् वृद्धिनिमितापकर्षेत्वस्त्येवतन्निवृत्तिः अन्यथावृद्ध्यसंभवादितिशूलपाणिः ।

हीं षोडशश्राद्धें बाराव्या वगैरे दिवशीं सपिंडनाच्या पूर्वीं केलीं असलीं तरी वृद्धिकर्मावांचून त्यांचा अपकर्ष झाला असतां पुनः त्यांच्या कालीं तीं करावीं . कारण , " ज्याचें सपिंडीकरण संवत्सराचे आंत केलें असेल त्याला देखील मासिक व उदकुंभश्राद्ध हें संवत्सरपर्यंत द्यावें " असें मदनरत्नांत अंगिरसाचें वचन आहे . आतां ह्या वचनानें मासिकांचा अपकर्ष सांगितला नाहीं , तर सपिंडीकरणानंतर स्वकालीं करावींच असें सांगितलें म्हणून अपकर्ष करण्याचें कारण नाहीं , असें कोणी म्हणूं नये . कारण , तसें म्हटलें तर " षोडशश्राद्धें केल्यावांचून सपिंडीकरण करुं नये " या वचनाचा विरोध येईल . आणि " ज्याचें सपिंडीकरण संवत्सराचे आंत केलें असेल त्याचीं तीं षोडशश्राद्धें पुनः यथाविधि करावीं " असें माधवीयांत गोभिलवचनही आहे . " ज्याचें सपिंडीकरण संवत्सराचे आंत केलें असेल त्याच्या षोडशश्राद्धांची द्विरावृत्ति करावी , असें गौतम सांगतो . " असें तेथेंच गालवाचें वचन आहे . षोडशश्राद्धांची द्विरावृत्ति सांगितली ती अकराव्या दिवशीं सपिंडीकरणपक्षीं समजावी . कारण , त्या दिवशीं आद्यमासिकाचा काल आहे , त्यासहित सर्वांचा अपकर्ष होऊन केलेलीं असल्यामुळें सर्वांची पुनरावृत्ति समजावी . इतर दिवशीं सपिंडीकरणपक्षीं जितक्यांचा अपकर्ष केला असेल तितक्यांची पुनरावृत्ति समजावी . आतां जें दीपिकेंत - " सपिंडीकरणानंतर तींच अनुमासिकें बारा पुनः करावीं . " असें सांगितलें आहे , म्हणून ऊनश्राद्धें पुनः करुं नयेत असें सांगितलें तें दीपिकेचें सांगणें वरील गोभिलादिवचनांशीं विरुद्ध असल्यामुळें चिंत्य म्हणजे प्रमाणशून्य आहे . आतां जें गौड - " सपिंडीकरणापर्यंत जी क्रिया ती प्रेतक्रिया जाणावी " ह्या शातातपवचनावरुन मासिकें प्रेतत्वाची मुक्ति करणारीं असल्यामुळें सपिंडीचा अपकर्ष केला असतां ‘ तदंतमपकर्षे स्यात् ’ म्हणजे ज्याचा अपकर्ष सांगितला असेल तदंत जीं कर्मै त्यांचा अपकर्ष होतो , ह्या जैमिनिसूत्रन्यायानें मासिकांचाही अपकर्ष असल्यामुळें त्या मासिकांची पुनरावृत्ति होत नाहीं . आतां जें " मासिक व उदकुंभ संवत्सरपर्यंत द्यावें " असें पूर्वीं सांगितलें तें वचन निर्मूल आहे . समूल आहे , असें म्हटलें तरी दर्शश्राद्धविषयक समजावें , असें ( गौड ) सांगतात . त्यांचें तें सांगणें पूर्वीं सांगितलेल्या व पुढें सांगावयाच्या वचनांशीं व निबंधग्रंथांशीं विरुद्ध असल्यामुळें मूर्खत्व असें समजून तें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . आतां जें मिताक्षरेंत - सपिंडीकरणानंतर आपल्या कालींच करावीं , अपकर्ष करणें हा अनुकल्प ( कनिष्ठपक्ष ) आहे , असें सांगितलें तेंही पूर्वीं सांगितलेल्या वचनाशीं विरुद्ध असल्यामुळें चिंत्य आहे . तेणेंकरुन वृद्धीवांचून अपकर्ष केला असतां पुनः करावीं . कारण , " ज्याचें सपिंडीकरण संवत्सराचे आंत होईल त्यालाही संवत्सरपर्यंत प्रेतत्व आहे " असें अग्निपुराणवचन आहे . वृद्धिनिमित्तानें अपकर्ष केला असेल तर त्या मासिकांची निवृत्ति आहेच . निवृत्ति केल्यावांचून वृद्धीचा असंभव आहे , असें शूलपाणि सांगतो .

कार्ष्णाजिनिः सपिंडीकरणादर्वागपकृष्यकृतान्यपि पुनरप्यपकृष्यंतेवृद्ध्युत्तरनिषेधनात् निषेधंचाह कात्यायनः निर्वर्त्यवृद्धितंत्रंतुमासिकानिनतंत्रयेत् अयातयामंमरणंनभवेत्पुनरस्यत्विति द्विरनुष्ठानंचोत्तरेषामेव नपूर्वेषांस्वस्वकालकृतानां तदाहमाधवीयेकार्ष्णाजिनिः अर्वागब्दाद्यत्रयत्रसपिंडीकरणंकृतं तदूर्ध्वमासिकानांस्याद्यथाकालमनुष्ठितिः हेमाद्रौशाठ्यायनिः प्रेतश्राद्धानिशिष्टानिसपिंडीकरणंतथा अपकृष्यापिकुर्वीतकर्तुंनांदीमुखंद्विजः वृद्धिंविनापकर्षेदोषमाहोशनाः वृद्धिश्राद्धविहीनस्तुप्रेतश्राद्धानियश्चरेत् सश्राद्धीनरकेघोरेपितृभिः सहमज्जतीति आधानेपकर्षमाहहेमाद्रावुशनाः पितुः सपिंडीकरणं वार्षिकेमृतिवासरे आधानाद्युपसंप्राप्तावेतत्प्रागपिवत्सरात् विशेषस्तूक्तोविवाहनिर्णये कण्वः नवश्राद्धं मासिकंचयद्यदंतरितंभवेत् तत्तदुत्तरसातंत्र्यादनुष्ठेयंप्रचक्षते गारुडेपि आपदाद्यकृतंयत्तुकुर्यादूर्ध्वं मृताहनि ।

कार्ष्णाजिनि - " सपिंडीकरणाच्या पूर्वीं अपकर्ष करुन केलीं असलीं तरीं वृद्धिकर्म आलें असतां पुनः अपकर्ष करुन करावीं , कारण , वृद्धिकर्मानंतर त्या श्राद्धांचा निषेध आहे . " निषेध सांगतो कात्यायन - " वृद्धिकर्म करुन नंतर मासिकें करुं नयेत . कारण , वृद्धिकर्म केल्यावर पुनः याचें मरण अयातयाम ( ताजें , प्रेतश्राद्ध ग्रहण करणारें ) होत नाहीं . " द्विरावृत्ति सांगितली ती सपिंडीच्या पुढच्याचीच समजावी . आपापल्या कालीं केलेल्या पूर्वींच्यांही नाहीं ; तें सांगतो माधवीयांत कार्ष्णाजिनि - " वर्षाच्या आंत ज्या ज्या कालीं सपिंडीकरण केलें असेल त्याच्या पुढील मासिकांचें आपापल्या कालीं पुनः अनुष्ठान करावें . " हेमाद्रींत शाठ्यायनि - " द्विजानें अवशेष राहिलेलीं प्रेतश्राद्धें तसेंच सपिंडीकरण हीं नांदीमुख ( नांदीश्राद्धयुक्तकर्म ) करण्याकरितां अपकर्ष करुनही करावीं . " वृद्धीवांचून अपकर्ष केला असतां दोष सांगतो उशना - " जो मनुष्य वृद्धिश्राद्धावांचून प्रेतश्राद्धांचा अपकर्ष करितो , तो श्राद्ध करणारा घोर नरकांत पितरांसह बुडतो . " आधान कर्तव्य असतां अपकर्ष सांगतो हेमाद्रींत उशना - " पित्याचें सपिंडीकरण वर्षाच्या मृतदिवशीं होतें . आधानादिक प्राप्त असतां हें सपिंडीकरण संवत्सराचे पूर्वीं देखील होतें . " विशेष निर्णय तर विवाहनिर्णयप्रसंगीं सांगितला आहे . कण्व - " नवश्राद्ध आणि मासिक जें जें अंतरित असेल तें तें उत्तर ( पुढील ) श्राद्धाच्या सहतंत्रानें करावें , असें विद्वान् सांगतात . " गारुडांतही - " आपत्ति वगैरे असल्यामुळें जें केलें नसेल तें पुढच्या मृततिथीस करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP