मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अष्टक| अकरावें अष्टक पहिलें दुसरे तिसरे चवथे पांचवे सहावें सातवे आठवें नववें दहावें अकरावें बारावें तेरावें चौदावें पंधरावें सोळावें अष्टक महाकालीचें रेणुकास्तव अंबाबाईचें तुकाबाईचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक अष्टक चिन्मयानंदाचें रेणुकेचें अष्टक - अकरावें श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : ashtakpoemvishnudasअष्टककविताकाव्यपदमराठीविष्णुदास अकरावें Translation - भाषांतर वृत्त : ( भुजंगप्रयात )नमो आदि गौरीसुता एकदंता ।नमो शारदा सदगुरु ज्ञानदाता ॥नमो आदिशक्ती महीषासुरारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥१॥तुला चिंतिल्या पावती मोक्ष प्राणी ।अशी गर्जना व्यासवाणी पुराणीं ॥ महाद्वाड हा एवढा पापि तारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥२॥अगा जाहलीसी अनाथाचि आई ।म्हणूनी तुला प्रार्थितों मी तुकाई ॥करी कींव कीं गांजिलों संवसारीं ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥३॥जगन्नायके ! आयके एक आतां ।उणें काय होतें मला अल्प देतां ॥बहु जन्मिचा मी तुझा ऊपकारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥४॥अराधीत मी दास तूझा अराधी ।करावी कृपा त्याहुनी आपराधी ॥कृपा जोगवा दान मागे भिकारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥५॥नको येउं कोपा कृपादृष्टिं पाहे ।मला आसरा दूसरा कोण आहे ॥तुला लाज माझी तुझी आस सारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥६॥अझूनि कशी पाहसी नीरवाण ।पहा माझिया दाटला कंठिं प्राण ॥जिवा त्रासलों पावलों कष्ट भारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥७॥श्रीदेवि जयदेवि जय जय भवानी ।महादेवि तूं माय कैवल्यदानी ॥स्तुती विष्णुदासाचिही आवधारी ।अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : September 05, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP