अष्टम स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सूर्यमंडलापासून । वरीचंद्रलक्षयोजन । दोनलक्षवरीयोजन । शुक्रमंडळविराजे ॥१॥

तितुकाचवरीसौम्य । समांतरेवरीभौम । गुरुशनीअंतरसम । मंडळेंयांचींशोभती ॥२॥

अक्रालक्षयोजन । वरीसप्तऋषीचेस्थान । तेरालक्षयोजन । ध्रुवतेथूनिउत्तरे ॥३॥

मळाकरितीशेतांत । मध्येंखांबरोवित । पांचसहाबैलबांधित । शेतकरीखांबासी ॥४॥

पहिलाजोखांबाजवळ । त्यासिभ्रमणथोडावेळ । दुज्यातिज्याक्रमेवेळ । लागेजेवीफिराया ॥५॥

तेवीयेथेंसर्वेश्वरी । भूतेसतृणधान्यापरी । ध्रुवस्तंबमध्येंकरी । आठबैलगुंफिले ॥६॥

सूर्यझालाकर्षक । आठाचातोचिनायक । जीवधान्यकरीपृथक । जडतृणदाखवीं ॥७॥

सूर्याचेहीखाली । राहुकेतुमहाबळी । अयुतयोजनेंमंडळीं । भ्रमतीतेथेंसर्वदा ॥८॥

सूर्यचंद्राचेगतिशी । समेवहोयराहूकेतूशी । आडयेतीमंडळाशी । ग्रहणनामतयाचे ॥९॥

चक्रजेंकांसुदर्शन । ज्वालामालीदैदीप्यमान । सूर्यरथातेंवेष्टून । भ्रमतसेसर्वदा ॥१०॥

तेंतेजनहोयसहन । चकितहोतीपाहुन । मुहूर्तमात्रथांबुन । निघूनजातिराहूकेतू ॥११॥

तयाखालींअयुतयोजन । लोक असतीपावन । सिद्धविद्याधरचारण । राहतीतेथेंनारदा ॥१२॥

त्याचेखालीयक्षराक्षस । भूतप्रेतपिशाचास । आहेजाणनिवास । मेघमंडळापर्यंत ॥१३॥

यावत्तीव्रमारुत । यावन्मेघवरीजात । तयासीअंतरिक्षम्हणत । ज्ञानसंपन्नपुरुषजे ॥१४॥

त्याचेखालींशतयोजन । पृथ्वीअसेमहास्थान । गरुडहंसादिउत्पन्न । शतयोजनपर्यंत ॥१५॥

सुपर्णश्येनसारस । उड्डानबळीमोठेंहंस । एवंगतीइतरपक्ष्यास । नाहींजाणपृथ्वीवरी ॥१६॥

पृथ्वीचेअधःप्रदेशांत । विवरेअसतींसात । सप्तपाताळयांम्हणत । पृथक्‍ सांगतोऐकिजे ॥१७॥

अयुतयोजन अंतर । प्रत्येकजाणमनोहर । तितुकाच आंतविस्तार । उंचतितकीचसर्वही ॥१८॥

अतलवितलसुतल । तलातलमहातल । रसातल आणिपाताल । बिलस्वर्गसातहे ॥१९॥

दैत्यसर्पदानव । भोगितीतेथेसर्वविभव । वलीपलितसंभव । रोगांदिकतेथेंनसे ॥२०॥

प्रथमवर्णिलेंअतल । तेथेंमयपुत्रराहेबल । शांणवमायाप्रबळ । निर्मिल्याजेणेंस्वबळें ॥२१॥

जांभईयेतातयाशीं । उत्पन्नकरीस्त्रीगणाशी । मोहितीलतीनलोकांशी । ऐशासुंदरीयौवना ॥२२॥

तीनप्रकारेंत्यानारी । उत्पन्नहोतानिर्धारी । स्ववर्णींजेरतिकरी । स्वैरिणीजाणप्रथमती ॥२३॥

रतहोय अन्यवर्णी । दुसरीजातीतीकामिनी । पुंश्चलींजीसर्वगमनीं । तीनप्रकारतयांचे ॥२४॥

त्यासीजेपुरुषरत । मदेंझालेगर्वित । एवंस्थितिअसेतेथ । वितलाचीवर्णिंतो ॥२५॥

हाटकेश्वरनामेंदेव । भवानीसहतेथेंभव । भोगयुक्तमहादेव । गणासहतेथेंवसे ॥२६॥

दोघांचेरेतापासून । नदीझालीउत्पन्न । हाटकीनामेंकरुन । नवलतेथेंएक असें ॥२७॥

वायुबळेंपेटेअनळ । जलप्राशीतेंसकळ । पुन्हाथुंकीउतावेळ । हाठकनामेंसुवर्णतें ॥२८॥

दैत्यांगनांचीभूषणें । होतींसर्वत्यास्रुवर्णें । सुतलींवसेमहापुण्यें । बलिदैत्यविख्यात ॥२९॥

जेणेंकेलेसत्पात्रदान । विष्णुहीझालावामन । देहवेगळाकरुन । सर्वस्व आर्पिलेंविप्रासी ॥३०॥

त्रिविक्रमरुपकेलें । द्विपदेंसर्व आक्रमिलें । स्थळचिनाहींउरलें । तृतीयपदठेवाया ॥३१॥

क्रोधेंम्हणेस्थळदेईं । अथवाशापमाझाघेई । बळीम्हणेमस्तकींदेई । पायमाझ्याअनंता ॥३२॥

देह अद्यापीउर्वरीत । ऐकूनीदेवेंऐसीमात । वरुणपाशेंबांधूनत्वरित । सुतळांमाजीआणिला ॥३३॥

भक्तितयाचीपाहून । देवझालासुप्रसन्न । मागम्हणेवरदान । बळिरायातुष्टलों ॥३४॥

तोम्हणेहेभगवान । इंद्रनव्हेमीअज्ञान । जेणेंपाहूनिनिधान । त्रिलोकविभवयांचिलें ॥३५॥

ज्यानेंस्वकार्याकारण । श्रमविलानारायण । सर्वेंश्वरजोवामन । झालाइंद्राकारणें ॥३६॥

ममपुर्वजमहाधन्य । प्रर्‍हादनामेंमहारत्न । जेणेंतुजपाहूनप्रसन्न । सेवाचिएकसंपादिली ॥३७॥

भोगसर्वहेनश्वर । संसारहाबहुदुस्तर । ज्यादर्शनेंहोयपार । तेथेंकायमागूंमी ॥३८॥

मजनसेवासना । सुखेंजावेनारायणा । ममह्रदयींबंधना । करुनिठेविलाअसेंमी ॥३९॥

नारदाम्हणेनारायण । नृपासांगेबादरायण । देवेंऐकूनत्याचेवचन । ऋणीतुझाम्हणेमी ॥४०॥

जीसंपत्तीइंद्रानसे । तीविष्णुतयादेतसे । दंडघेउनितिष्टतसे । द्वारीजयाच्या अद्याप ॥४१॥

एकदांआलारावण । म्हणेबळीसजिंकीन । पदेंझुगारीवामन । अयुतयोजनदुरपडे ॥४२॥

एवंप्रभावेंतोबळी । राहतसेसुखेंसुतळीं । तलातलीमहाबळी । मयासुरमायावी ॥४३॥

महातलींसर्पगण । राहतीमहाभीषण । शतफणसहस्रफण । महाविषतक्षकांदि ॥४४॥

रसातलींदैत्यवसती । निवांतकवचप्रभृति । पातालींनागराहती । नागलोकश्रेष्ठजे ॥४५॥

वासुकीश्वेतशंख । धनंजयमहाशंख । कंबलधतराष्ट्रकुलिक । शंखचूड अश्वतर ॥४६॥

महामर्षविषोल्बण । महाभोगपंचफण । दशशतसहस्रफण । मणिमस्तकतेजागळे ॥४७॥

पातालाचेंमूलांत । भगवत्कलाअसेविस्तृत । ज्यासम्हणतीअनंत । तीससहस्रयोजने ॥४८॥

अहंपदजोअभिमान । पुर्णरुपहाभगवान । पृथ्वीज्याच्यासर्षापमान । शोभतसेंमस्तकी ॥४९॥

दृष्टीदृश्यआकर्षण । होयम्हणोनिसंकर्षण । ब्रम्हलोकींज्याचेंवर्णन । करीतीज्याचें ॥५०॥

नारदम्हणेनारायणा । विचित्रवर्णिलीलोकरचना । कर्मस्वभावभिंनाभिंना । केवींकेलेंजगाचें ॥५१॥

धर्म अधर्मंलक्षण । सांगादेवीआराधन । वर्णीतयानारायण । नृपातेचिऐकतूं ॥५२॥

गुणेंकेलेंसर्वभिन्न । सत्वतोधर्मसंपन्न । धर्माधर्मरजोगुण । तमकेवळ अधर्मची ॥५३॥

परीहे एकत्र असती । कदांनिराळेनहोती । तेणेंकर्मचित्रगती । पुण्यपापमिश्रित ॥५४॥

पापहोतांअधिक । प्राप्तहोयत्यासिनर्क । पुण्यजरीविशेषक । स्वर्गाधिकमिळतसे ॥५५॥

पापपुण्याचेविवरण । पुढेंअसेप्रसंगान । उद्देशमात्रबोलूंन । आराधनवर्णीलें ॥५६॥

स्वधर्माचेपालन । करुनकीजेसेवन । श्रीदेवीसिनिवेदन । घृतकीजेप्रतिपदी ॥५७॥

विप्रासिदेतांघृत । रोगनासेसमस्त । शर्कराद्वितीयेसिदेत । दीर्घायुष्यहोयतेणें ॥५८॥

तृतीयेसीदेतांपय । सुखीतेणेंनरहोय । चौथेसघारगेदेय । विघ्ननासेंसर्वही ॥५९॥

पंचमीसदीजेकेळी । मेधावाढेतेणेंप्रबळी । मधगुळभावबळी । दीजेषष्ठीसप्तमीस ॥६०॥

नारळदेतांअष्टमीस । शोकाचाहोयनाश । नैवेद्यकरुनिअंबेस । दानदीजेब्राम्हणा ॥६१॥

हयदेतांनवमीदिनी । इहपरसुखत्यालागुनी । यमलोकनसेमरणी । तिलदानदशमीस ॥६२॥

दहीदेतांएकादशीं । तोनरप्रियदेवीशीं । पोहेदेतांद्वादशीं । अतिप्रियनरतीतें ॥६३॥

त्रयोदशींसदेईंचणे । संततिलाभहोयतेणें । चतुर्दशींसत्तुदानें । आवडताहोयशिवाचा ॥६४॥

पौर्णिमेसदेतांपायस । तेणेंउद्धरिलेपित्रास । होमकीजेत्यादिवस । देवीप्रित्यर्थनारदा ॥६५॥

ज्यावस्तूज्यातिथीस । वर्णिल्यात्यादेवीस । अर्पूनदीजेब्राम्हणास । होमकीजेविशेषें ॥६६॥

पायसदूधकेळेंलोणी । गुळसाखरतुपजाणी । सातवारीक्रमेंकरुनी । अंबेसिकीजेनैवेद्य ॥६७॥

तूपतिळसाखरदूध । दहीमलईश्रीखंडशुद्ध । मोदकफेणीप्रसिद्ध । सक्करपारेकसार ॥६८॥

पापडघिवरवटुक । खर्जुररससम्यक । पुरणगोडसुरणपाक । गुळपोहेद्राक्षेही ॥६९॥

खजूरचारोळयाघारगे । लोणीमूगमोदकचांगे । महाळुंगक्रमेसांगे । नैवद्यजाणनक्षत्री ॥७०॥

गुळमधतपदूध । दहीताकघारगेविविध । लोणीकाकडीकोहळाशुद्ध । मोदकफणसकेळेंही ॥७१॥

जांबुळ आंबेआणितिळ । नारिंगडाळिंबबोर आंवळे । खीरपोहेचणेनारळ । लिंबुकसेरुसुरणादि ॥७२॥

क्रमयोगेंअंबेप्रती । निवेदितांअतिप्रीति । ऐसेंचिआतांकरणाराप्रती । क्रमेंसांगूनैवेद्य ॥७३॥

कसारमांडेफेणीमोदक । पापडलाडूघारगेदेख । तिळदहीतूपचोख । मधजाणक्रमानें ॥७४॥

चैत्रशुद्धतीजेपासून । मधुवृक्षाकीजेपूजन । प्रतिशुक्लतृतीयादिन । मासिंमासींपुजावा ॥७५॥

बारामासांचेनैवेद्य । सांगतोअतांशास्त्रवेद्य जेणेंहोयप्रसाद । जगदंबेचासत्वरी ॥७६॥

पंचखाद्यगुळमधु । लोणीदहीपायसबोधू । फेणीश्रीखंडसुस्वादू । गोघृत आणिनारळ ॥७७॥

मंगलावैष्णवीमाया । कालरात्रीदूरत्यया । मातंगीआणिमहामाया । कालीकमलवासिनी ॥७८॥

शिवातेसहस्रचरणा । मंगलरुपिणीजाणा । मधुवृक्षींपूजना । नावेंऐसीस्मरावी ॥७९॥

सांगकरुनिपूजन । मगप्रेमेंकीजेस्तवन । कामनामाझ्यासर्वपूर्ण । करीऐसेंप्रार्थावे ॥८०॥

कमलनयनामनमोहिनी । जगद्धात्रीभवानी । माहेश्वरीवित्तदानी । महादेवीनमोस्तु ॥८१॥

मंगलेपरमेधात्री । मार्गदेरौद्रेरिपुहंत्री । ब्रम्हरुपेमददात्री । मानगम्येनमोतुला ॥८२॥

मनस्विनीमदोन्मत्ते । मुनिध्ययेमहोंनते । सुर्यसहेजयोद्धते । लोकेश्वरीनमोस्तु ॥८३॥

मोहनाशेचंद्रनिभे । यममोक्रीमेघप्रभे । यमपूज्येतडित्प्रभे । यमनिग्रहेनमोस्तु ॥८४॥

समस्वभावेसर्वेशी । संगवर्ज्येसंगनाशी । कामरुपेंकरुणेशी । कारुण्यविग्रहेनमोस्तु ॥८५॥

कंकालक्ररेकामक्षी । मर्मभेदिनीमीनाक्षी । माधुर्यरुपेमृगाक्षी । मधुस्वनेनमोस्तु ॥८६॥

महामंत्रेमहाशीले । महाघोरेमहाकाले । मंत्रगम्येमंत्रबाले । मंत्रप्रियेनमोत्तु ॥८७॥

मनुष्यमानसवासिनी । मन्मथारिप्रियकारिणी । तश्वथ्यवटचारिणी । अंतश्चरेनमोस्तु ॥८८॥

निंबाम्रकपिथ्यबदरी । पनसार्क आणिकरीरी । क्षीरवृक्षाचेअंतरी । वससीतुजनमोस्तु ॥८९॥

दुग्धवल्लीतराहसी । दयादाक्षिण्यकरिसी । सर्वज्ञातूंआवडसी । तोतुज आवडे ॥९०॥

एवंकरीजोस्तवन । सकलक्लेशनिवटोन । त्यासिकरिसुखभाजन । अंबासदादयेनें ॥९१॥

पुढेंप्रकृतिपंचक । सांगेननारदाऐक । नारायणऋषिनायक । एवंवदलानृपाळा ॥९२॥

तेंसुरस आख्यान । नवमस्कंदेकरुन । होईलशौनकावर्णन । एवंसुतबोलिला ॥९३॥

तेचिकथायेथेंसुरस । भक्तपिवोतसुधारस । दुर्गजोप्राकृतजनांस । सुगमकेलाअंबेनें ॥९४॥

पांच उणचारशत । श्लोक ऐसेंभागवत । सारसंग्रहभाषेंत । अष्टमस्कंदसंपविला ॥९५॥

श्रीदेवीविजयेअष्टमेचतुर्थोध्यायः समाप्तोयंस्कंदः ।

इति श्रीदेवीविजय अष्टमे स्कंदः समाप्तः ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP