हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
भद्रेचे मुख आणि पुच्छ

भद्रेचे मुख आणि पुच्छ

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


भद्रेचें मुख .

शक्राष्टमुनितिथ्यब्धिर्दिगीशाग्निमिते तिथौ ।

प्रथमादिषु यामेषु पंचनाडयस्तु वै क्रमात् ।

भद्रामुखं परित्याज्यं शुभकर्मसु सर्वदा ॥१३०॥

प्रत्येक महिन्यांत आठ वेळ कल्याणी असते , हें वर सांगितलेंच आहे . ज्या तिथींत कल्याणी असेल त्या तिथींच्या आरंभापासून कांहींनियमित प्रहरांच्या पहिल्या पांच घटिकांना कल्याणीचें मुख अशी संज्ञा आहे . तें अत्यंत अशुभ होय . कोणत्या तिथीच्या कितव्या प्रहरांत मुख असतें हें खालीं दिलें आहे -

 

कृ .

शु .

कृ .

शु .

शु .

कृ .

शु .

कृ .

तिथी

१४

१५

१०

११

प्रहर

उदाहरणार्थ , कृष्णचतुर्दशीच्या पहिल्या प्रहरांतील पहिल्या पांच घटिका , शुक्ल अष्टमीच्या दुसर्‍या प्रहरांतील पहिल्या पांच घटिका इत्यादि . याप्रमाणें कल्याणींचें मुख सर्वत्र वर्ज्य करावें .

भद्रेचें पुच्छ .

सर्पः सप्तस्तिथिः शक्रो दिक्रुद्राग्निश्रुतिस्तिथौ ।

प्रथमादिषु यामेषु क्रमादंत्यघटित्रयम् ॥

पुच्छं विष्टेर्विजानीयात्सर्वकार्येषु मंगलम् ॥१३१॥

ज्या तिथींत कल्याणी असेल त्या तिथीच्या आरंभापासून कांही नियमित प्रहरांच्या शेवटच्या तीन घटिकांना कल्याणीचें पुच्छ असें म्हणतात . कोणत्या तिथीच्या कोणत्या प्रहरांत पुच्छ असतें तें खालीं दिलें आहे -

 

 

शु .

कृ

शु .

कृ

कृ

शु .

कृ

शु .

तिथी

१५

१४

१०

११

प्रहर

उदाहरणार्थ , शुक्ल अष्टमीच्या पहिल्या प्रहरांतील शेवटच्या तीन घटिका , कृष्ण सप्तमीच्या दुसर्‍या प्रहरांतील शेवटच्या तीन घटिका , इ ० याप्रमाणें भद्रेचें पुच्छ जाणावें . हें निर्दोष असून सर्व कार्यांना प्रशस्त मानिलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP