ब्रह्मानन्दे योगानन्द - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


एथपर्यंत विवेकपंचक आणि दीपपंचक असे दोन भाग झाले. आतां या भागांत पांच प्रकारचें आनंद सांगितलें आहेत. त्यापैकीं ब्रह्मनंदाचें विवेचन आह्मी या प्रकरणांत करणार ह्मणून यास ब्रह्मनंद असें नांव आह्मीं ठेवितो. त्यांचे चांगलें ज्ञान झालें असतां या लोकींचे व परलोकींचें जे अनर्थ आहेत. त्यांपासून मुक्त होऊन मनूष्य आनंदरुप ब्रह्मचा होतो. ॥१॥

यांस श्रुतीचें प्रमाण ब्रह्मवेत्यास परब्रह्मची प्राप्ति होते. आत्मवेत्ता शोक सागरांतुन तरुन जातो. हा आत्मा एक आनदरसच आहे यापेक्षा मोठा आनंद दुसरा नहई. तो मिळाला तरच प्राणी आनंदी होतो त्यावांचून होणार नाहीं. ॥२॥

सद्गूरुकृपेनें जेव्हां यास ब्रह्मस्थिति प्राप्त होतें तेव्हा तो भयरहित होतो, आणि त्यांत अंतर पडल्यास त्याला भय प्राप्त होतें. ॥३॥

"भीषास्माद्वातः पवते" या श्रुतीचाही अभिप्राय हाच आहे. तो असा कीं, वायू, सूर्य, वन्ही, इंद्र व मृत्यु ह्म ज्या पांच नियामक देवता, धर्म चांगला जाणत असूनही त्यांनी जन्मातरीं ब्रह्मंस भेद दृष्टीनें पहिल्यामुळें त्याच्या भीतिनेंच आपली कामें बजावीत आहेत. ॥४॥

ब्रह्मनंद जाणणार्‍या पुरुषाला कशाचीही भिति नाहीं. कारण भीतीला दुसरी वस्तु असली पाहिजे.परंतु तो ब्रह्मनंद अद्वैत आहे ह्मणून तेथें भीतीस जागास उरली नाहीं. अमुक पुण्य केलें नाही. अमुक पाप मी केलें अशी जी कर्मजाड्यापासून होणारीं चिंता ती त्यास मात्र बाघत नाही. इतर मुढांस बाघतो. ॥५॥

याप्रमानें तो तत्त्ववेत्ता पुण्यपापरुप दोन्ही कर्मांचा मिथ्यात्व अनुसंधानानें त्याग करुन आत्म्याचेंच स्मरण करीत बसतो. ती केलेलीं पुण्यपापें आत्मरुपेकरुन तो पाहतो. ॥६॥

कल्पांची कल्पें जरी गेलीं तरी कर्मांचा क्षय भोगांवंचून होतच नाहीं. असें शास्त्र आहे. त्यावरुन पुर्वजन्मींची जीं कांहीं अप्रसिद्ध कामें आहेत त्यांचा क्षय केवल आत्मानुसंधानानें कसा होईल ? तो न झाल्यास चिंता तरी कशी जाईल, अशी शंकाक कोनाची असेल तर त्यास आह्मी हें मुडकें श्रुतीचें प्रमाण देतों तिचा अभिप्राय असा कीं पर, ह्मनजे हिरण्यगर्भादि ब्रह्मदेव तेही कमी माण देतों तिचां अभिप्राय असा कीं पर ह्मणजें हिरण्यगर्भादि ब्रह्मदेव तेही कमीं ज्यापासून असें ब्रह्म त्या ब्रह्मचा साक्षात्कार झाला असतां हृदयांची ग्रंथी ह्मणजे अन्योन्याध्यास नाहींसा होतो आत्मा देहापसून निराळा आहे कीं नाहीं इत्यादी सर्व संशय पळून जातात आणि सर्व पापपुण्यरुप जी कर्में त्यांचे कारण अज्ञान नष्ट झाल्यामुळेंच क्षय पावतात. आणि सर्व पापपुण्यरुप जीं कर्में त्यांचें कारण अज्ञान नष्ट झाल्यामुळें क्षय पावतात. ॥७॥

जन्ममृत्यु तरण्यास ज्ञानावांचून दुसरा मार्गच नाही. अशाविषयीं श्वेताश्वतर शाखेमध्यें प्रमाण आहे. त्याचा अभिप्राय आसा कीं, पुर्वोक्त आत्म्यास जाणणारा पुरुष मृत्युस अतिक्रमुन जातो ज्ञानावांचून दुसरा मार्ग नाही. ब्रह्मज्ञान झालें असतां काम क्रोधादक पाशाची हानी होते. हे पाश क्षीण झाले असतां पुनर्जन्म होत नाहीं .॥८॥

ज्ञानीं शोकानें तरुन जातो असें म्हटलें त्यास आणखी एक दुसरें प्रमाण आहे त्याचा अर्थ असा आहे कीं ब्रह्मज्ञान झालें असता धीर पुरुषाचें हर्षशोक जातात मग त्याचे हातुन पापें घडली आणि पुण्यें घडलीं नाहींत तरी त्याला ताप मुळींच होत नाहीं. ॥९॥

याप्रमाणें ब्रह्मज्ञान झालें असतां अनर्थाची हानी होऊन आनंद प्राप्त होतो म्हणण्याविषयीं पुष्कळ श्रुति स्मृति पुराणाचा डंका वाजत आहे. ॥१०॥

आनंद तीन प्रकारचा ब्रह्मनंद विद्यानंद आणि वियषानंद ह्मपैकीं ब्रह्मनंदाचें विवेचन प्रथमतः करितों. ॥११॥

ब्रह्म हें आनंदरुपच आहे अशा विषयीं तैत्तिरीय श्रुतीचें प्रमाण आहे त्याचा अर्थ असा कीं भृगूनें आपला पिता जो वरुन त्यापासून ब्रह्मलक्षण समजून घेऊन अन्न प्राण मन आणि विज्ञान या चार कोशांचा त्याग करुन आनंदमय कोश हाच ब्रह्म आहे असं जाणतां झाला. ॥१२॥

कारण त्याल ब्रह्मची पुढें सांगितलें सर्व लक्षणें लागतात, ज्याच्या पासून सर्व भूतें होतात तें ब्रह्म. एथेंही सूरतानंदापासून सर्व प्राणी होतात. जेणेंकरुन सर्व प्राणी वांचतात तें ब्रह्म या आनंदानेंही सर्व प्राणीं वांचतात तें ब्रह्म या आनंदानेंही सर्व प्राणीं जेथे सर्वांचा लय होतो तें ब्रह्म या आनंदांतही जीवांचा लय होतो. याचा अनुभव सूषुप्तीत सर्वांस आहे ह्मणून आनंदच ब्रह्म आहे असं सिद्ध केलें. ॥१३॥

ब्रह्मला आनंदारुपता आहे एतद्विषयीं छांदोग्य श्रुतीचेंही प्रमाण आहे त्याचा भावार्थ असा कीं आकाशादि पंचभूतांच्या उत्तत्तीपुर्वी ज्ञातृज्ञानज्ञेय त्रिपुटिरुप द्वैत मुळीच नव्हतें केवळ एक व्यापक आत्माच होता कारण प्रलयकालीं ती त्रिपुटी नाहीं असा वेदांत सिद्धांत आहे. ॥१४॥

कारण परमात्म्यापासून उप्तन्न झालेला विज्ञानमय जो जीव तोच ज्ञाता मन हेंच ज्ञान, आणि बाकीचे सारे शब्दादिक विषय हें ज्ञेय होत. तेव्हा ही त्रिपुटी मिळुन सर्व जग झालें मग त्यांचे उप्तत्तीचें पुर्वी ती त्रिपुटी नव्हती हें कांही सांगावयास नको ॥१५॥

तीहींचा अभाव झाला असतां आत्मा आपण अद्वैत परिपुर्ण राहतो. याचा अनुभव ज्ञान्यास समाधींत आणि इतर लोकांस सूशुप्ति व मुर्च्छा या अवस्थेत आहे ह्मणून सृष्टिपुर्वीही त्या त्रिपुटीचा अभाव असल्यामुळे तो आत्मा तसाच असला पाहिजे. ॥१६॥

त्रिपुटीच्या अभावी पुर्ण आत्मा राहतो असें सांगितलें तेवढ्यावरुन तो आनंदरुप कसा ठरतो अशी कोनी शंका घेण्याचें कारण नाहीं कारण नारदास फार शोक झाला असतां सनत्कुमारानें असें सांगितलें कीं " बाबरें, जें भूमा ह्मणजे पुर्ण आहे, " तेंच सूखरुप आहे या त्रिपुटीनें परिच्छिन्न झालेल्या अल्पामध्यें मुळींच सूख नाहीं." ॥१७॥

नारदास शोक होण्याचें कारण हेंच कीं, पुराणासहित पांच वेद व अनेक प्रकारची सर्व शास्त्रें जाणूनहीं आत्मज्ञान त्यास झालें नाहीं. ॥१८॥

वेदाभ्यास होण्यापुर्वी केवळ त्रिविधतापाचाच शोक होतो. नंतर अभ्यासाचे श्रमाचा शोक, विस्मरणाचा शोक, दुसर्‍यानीं केलेल्या तिरस्काराचा शोक, बरें कदाचित चांगलें अध्ययन झालें तर गर्वाचा पुनः शोक आहेच. ॥१९॥

नारदास अति शोक झालेला त्याने सनत्कुमारास केलेल्या पुढील प्रश्नावरुन समजून येतो नारद ह्मणतो महाराज मला फार शोक होत आहे. यापासून मला पार करा. सनत्कुमार म्हणाला बाबारे यापासून पार होण्यास सूख म्हणजे काय हें समजलें पाहिजे. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP