-
स्त्री. १ शहराच्या , रस्त्याच्या विशिष्ट भागांत चोर , भामटे इ० कांचा बंदोबस्त करण्याकरितां ठेवलेली शिपायांची तुकडी . - पया ५१ . हे स्वयंपाक करून जेवतात तों चौकी आली . - स्वप १४९ . २ पाहार्याकरितां , बंदोबस्ताकरितां ठेवलेल्या शिपायांचें ठाणें ; गेट ; नाकें . ३ पाहारा ; राखण . तयाभोंवती चौकी बळकट । - दावि ३९१ . माझ्या घराची चौकी तुम्ही करा . ४ ( वीणा इ० तंतुवाद्यांतील ) घोडी ; तारदान ; अट . ५ चौरंग ; घडवंची ; देव वगैरे ठेवण्यासाठीं केलेली लांकडी , चौकोनी बैठक ; आसंदी ; तक्त . मुकुट काढुनी मस्तकिं वरले । चंदनचौकीवरि विस्तारिले । - अमृत ३१ . ते मांडिली रत्नजडीत चौकी । - सारुह ६ . १७ . गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें । - दा ४ . ७ . ६ . ६ चार ध्रुपदांचा समुदाय . ७ ( बायकी ) प्रकार ; विधि ; संस्कार . चवथ्या दिवशीं चवथी चौकी । बाळबाळंतिणिची न्हाणी हो होती । - पाळणेसंग्रह पृ . ३ . ८ ( गो . ) घराची ओसरी . ९ दुधाचे दांत ; ( माणसाची ) पुढील दांतांची चौकडी . १० देवडी ; आल्यागेल्याची चौकशी , वर्दी जेथें होते ती जागा ; पाहारा . ११ मांड ; ठाणें ; बैठक . जव माणकोबांनीं चौकी मांडुनी । सभोंवतीं भावें रंग भरुनी । - दावि ७८६ . [ सं . चतुष्किका ; प्रा . चौक्किआ = चौक ; हिं . चौकी = बसण्याचा पलंग ; पहारा ] ( वाप्र . )
-
०देणें पहारा करणें ; राखण करणें . सामाशब्द - - चे दांत - पुअव . ( माणसाचे , मुलाचे ) दुधाचे दांत , पुडील दांत ; ज्यांचा पदार्थ फोडण्याकडे उपयोग होतो ते , चौकडीचे दांत . हे प्रत्येक जाभाडांत चार असे एकंदर आठ असतात . कर्णी कुंडलें तळपती । लघुदंत चौकीचे झळकती । - ह ४ . १७२ .
-
०दार पु. पहारेकरी , रखवालदार ; चौकीवरील शिपाई . नजीबखान रोहिला याणे चौकीदारांचा शिरच्छेद केला . - भाब २९ . [ हिं . चौकी + दार ]
-
०दारी स्त्री. १ पहारा ठेवण्याचें , रखवालदाराचें काम . २ पहारा ठेवण्याबद्दलचें वेतन . ३ चौकीदाराबाबत गांवकर्यांवर बसविलेला कर . [ चौकीदार हिं . ] पहारा , पाहरा , पाहारा - पु . राखण ; रखवाली ; बंदोबस्त . ( क्रि० असणें ; होणें ; करणें ). - पया १०५ . त्या किल्ल्याभोंवता चौकीपाहरा चांगला आहे . [ हिं . चौकी + पहरा ]
Site Search
Input language: