|
वरुण कुल, कॅपॅरिडेसी (कॅपॅरेसी) वरुण (घायवर्णा) नेपती (करीर) तरटी, वाघाटी, काबरा, गोविंदफळ ह्या द्विदलिकित वनस्पतींच्या वंशाचे शास्त्रीय नाव (कॅपॅरिस) या कुलाला देण्यात वापरले असून याचा अंतर्भाव पॅपॅव्हरेलीझ अथवा अहिफेन गणात बेसींनी व वरुण गणात (कॅपॉरिडेलीझ) हचिन्सन यांनी केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे - द्विलिंगी फुले, संदले ४-८, प्रदले क्वचित कमीजास्त, सुटी, केसरदले अनेक किंवा थोडी व अक्षावर (केसरधर) किंजदले दोन किंवा अधिक, जुळलेली व ऊर्ध्वस्थ आणि बहुधा अक्षावर (किंजधर) बीजकविन्यास तटलग्न. पिवळी तिळवण व पांढरी तिळवण याच कुलात येतात. (capparaceae)
|