-
न. दाढी व कल्ले ( तिरस्कारार्थी ) ' मग आपुले करकमळें । ब्रह्मायानें खाडं सोडविलें । ' कथा ५ . ४ . १८ . ' वक्त्यांचें खाड हाले । ' - गीता २ . १३९८ . २ दाढीची हजामत ; दाढी . ' अर्ध खाड अर्ध श्मश्रु । मुंडण करुन टाकिलें । ' मुविराट ६ . १४१ . ( सं . खड ; अर . खड = गाल ) म्ह० खाडास वेगळें बोडास वेगळें कोण देतो ? = लहानसहान गोष्टीत भेद कोण करतो ? खाडकी - स्त्री . १ ( गो .) दाढी . २ ( कु .) हनुवटी . खांडमिशा - स्त्री . अव . १ दाढी वमिशा . ( एक . व .) खांडमिशीं . २ चाई लागलेल्या , अर्धवट काढलेल्या , जागाजागी खंड पडलेल्या , ओठाच्या खळग्यांत खंड पडलेल्या मिशा . ' युद्धि खांडमिशा बोडी । हे आपरवडी त्वां केली । ' - एरुस्व १३ . ११ . ' जळली मुखें भस्मल्या खांडमिशा । ' - रामदासांची कविता भाग . १ पृ . ८ . ( खांड - दाढी + मिशा ; किंवा खड - त्रुटित + मिशा )
-
स्त्री. १ ताली , बंधारा , भिंत यांतील भेग , तडा , चीर , भोंक . ' खाचरास खांड पाडली .' २ कातरा ; सड ; दांता ; खरा ( तरवार , विळा यांच्या धारेवरील ). ३ दांतांमधील खिंड ४ पिवळसर व भरड हस्तकृतीची साखर . ही थोडी अंबुस असतें . ' खाये खोर खांड । ' तुगा ४२९ . ०न . भक्कम व चौरस किंवा आधीं तुळई तूळवट . २ एखाद्या वस्तुचा तुकडा ( सुपारी , बिब्बा , हळकुंड , चंदन , तुळवट . २ एखाद्या वस्तुंचा तुकडा ( सुपारी , बिबा , हळकुंड , चंदन गोवरी इ० ) ऐसें ह सेंडया कडिल खाड । ' - दा २० . ३ . ४ . ३ टॊळी ; दांटी ; कळप ( बकरी , मेढ्यां यांचा ). ४ झाडाचा ठोकळा , भाग ५ शेतांचा तुकडा . ६ धान्याचा चुरा ; कळण . - वि . १ दाट . २ भंगलेले . असावें का खांद देउळी । ' - भाए ४९३ . ( सं . खंड ) सामशब्द -
-
पु. तरवार खांडा पहा .
-
पु. ( गो .) लहान दगडी पुल ; सांडवा . ( खड )
Site Search
Input language: