-
v t Twist, contort.
-
उ.क्रि. १ वस्त्रांतून किंवा छिद्रयुक्त पात्रांतून ओतून चाळणें ; स्वच्छ करणें . २ रद्द करणें ; बाजूस टाकणें ; परतविणें ; घालविणें ; वाटेस लावणें . ३ ढाळणें ( अश्रु , केंस , पिसें ). ४ घालणें ( अंडीं ). ५ वर्जणें ; वगळणें ; टाकणें ( माणूस , वस्तु , गोष्ट ). सगळा गांव बोलावला पण चार घरें गाळलीं . ६ शुध्द करणें ; चकचकीत करणें ( धातूचे जिन्नस विस्तवांत घालून ). ७ यंत्रांत दाबून पिळून काढणें ; तेल , अर्क काढणें ( गळिताचें धान्य , बीं यांचें ). ८ ( अवसान हातपाय इ० शब्दास जोडून ) धीर सोडणें ; कच खाणें ; खचणें . ९ रस करणें ; वितळविणें ; पातळ करणें . १० स्वच्छ करणें ; मळ , काढणें ( विहीर , तळें , धरण यांतील ). प्राज्य प्रीतिद झालें सुहृदांला गाळीलें जसें आज्य । - मोसभा ७ . ३ . [ सं . गल = गळण ]
-
न. चाळणी ; गाळणी .
-
गाळीव मूर्ति-वस्तु
Site Search
Input language: