-
पुन . १ युक्ति ; वेत ; धाडस ; यत्न ; कारस्थान . ' पवें करावीं अचाटें । चालवावी भक्तांची थाटें । नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग । ' - दा २ . ९ . १७ . २ त्रासाचें अवघड , काम . ' हजार कचाटें करावीं तेव्हां कोठें पोट भरतें .' ३ घोंटाळा ; संकट ; अडचण ; भानगड ; लचांड . ' ऐसें सांगतां अचाट । तुज वाटेल हें कचाट । ' - एभा ७ . ३४५ ; १४ . ४५८ . ४ तोहमत ; कुभांड ; दुसर्याचें नुकसान करण्यासाठीं योजलेली गुप्त युक्ति ; व्यूह ( सं . कृच्छ्र + पात ?)
-
ना. अडचण , घोटाळा , भानगड , लचांड , संकट ;
-
ना. कुभांड , तोहूमत ;
-
ना. कारस्थान , गुप्तकट , जाळे , व्यूह , सापळा .
Site Search
Input language: