-
वि. १ चालू असणारा ; गतींत , उपयोगांत असणारा ; सुरू असलेला . २ उपयोगांत येण्यासारखें , तीक्ष्ण ( धार किंवा धार लावलेलें हत्यार , शस्त्र ). ३ प्रचारांत असणारा ; अस्तित्वांत असलेला . वर्चस्व असलेला . [ चालणें ] सामाशब्द -
-
०कज्जा मोकदमा - पु . सुरू असलेला तंटा , भांडण किंवा प्रकरण .
-
०काळ पु. भरभराटीचा काळ ; उत्कर्षाचे दिवस . बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ । - अमृत ११८ .
-
०गाडा पु. सरळ चाललेला गाडा ; सुरळीत चाललेला क्रम , परिपाठ , एखादें काम . म्ह० चालत्या गाडयास खीळ घालणें = सुरळीतपणें चाललेल्या कामांत विघ्न करणें . घोडा - पु . कामांत असलेला , वापरण्यांत असलेला , जिवंत घोडा . चालत्या घोडयावरच्या गोमाशा - घोडा जिवंत असतांनाच त्याच्या अंगावर गोमाशा बसतात , मेल्यावर बसत नाहींत , यावरून लक्षणेनें माणसाजवळ पैसा , अधिकार असतो तोंपर्यंतच लोक त्यास चाहतात ; आश्रयाला असणारे कार्यसाधु लाळघोटे लोक यांना म्हणतात . चालत्या पायीं - क्रिवि . चालत असतांनाच ; न थांबतां ; ताबडतोब . चालत्या पायीं परतणें
Site Search
Input language: