-
स्त्री. घायपत - पात पहा .
-
न. १ लढाईत मेलेल्या , अपघातानें मृत्यु पावलेल्या पितरांचें महालय श्राध्द .
-
वि. १ जखमी झालेला ; शस्त्राचे वार ज्याच्या अंगावर झाले आहेत असा ; आघातानें , घावानें , व्याकुळ झालेला . रण तुंबळ , घुमतें घायाळ , गणती नाहीं मुडद्यांची । - ऐपो १८५ . बायका भिवयांचें धनुष्य करून मदनाचे विषारी बाण सोडून पुरुषांना घायाळ करितात . - बाय १३ . २ ( ल . ) ( दाव्यांत , वादांत ) चीत , कुंठित , प्रतिहत केलेला ; पराजय , कुप्रसिध्दि इ० कारणांमुळें मानखंडना पावलेला . ३ कमजोर झालेला ( रोग , शत्रु इ० ). ४ ( लाजिरवाण्या कृत्यामुळें ) मान खालीं घालणारा ; समाजांत ( आपलें ) तोंड लपविणारा त्याच्या पोरीनें व्यभिचार केला म्हणून तो घायाळ झाला . [ घाय ]
-
०चतुर्दशी स्त्री. भाद्रपद शुध्द चतुर्दशी . या दिवशीं घायाळाचें , अपघातानें मेलेल्याचें महालय श्राध्द करतात .
Site Search
Input language: