-
वि. १ ज्याचे नाक कापलेले आहे असा . २ आखूड , चपट्या , बसक्या नाकाचा . ३ ( ल . ) कांही अंशी अपुरी , दोषयुक्त राहिलेली , व्यंग , गोष्ट , कार्य इ० [ हिं . नकटा ; नाक + कटा = काटणे ; प्रा . णक्क = नाक ; हिं . नक ] नकट्यापुढे नाक खाजविणे - नकट्यास नकटा म्हणून खिजविणे ; मुद्दाम खिजविणे ; वेडावणे . म्ह ० १ नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने = प्रथम नकट्या मुलीचे लग्न लौकर जुळत नाही , जुळले तरी त्यांत अनेक अडचणी येतात . यावरुन आधीच दुष्कर असलेल्या कामांत अडचणीवर अडचणी येणे . २ नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये = शरीराने व्यंग असलेले चालेल पण धाकटा मान , धाकटेपण येऊं नये . कारण धाकट्याची प्रतिष्ठा कोणी ठेवीत नाही , त्याला नेहमी अरेतुरे करतात , कामे सांगतात व हलके लेखतात , तसे नकट्याचे होत नाही . ३ सुरुखुरु सापिका आणि नकटा निरुका .
-
Nose-cut. 2 That has a snub or squab nose, camous. Pr. नकटीचे लग्नास बाराशें विघ्नें; नकटें व्हावें पण धाकटें होऊं नये. 3 fig. Defective, lacking, wanting entireness or completion.
-
०वकटा वि. कुरुप आणि हिडीस , ओंगळ दिसणारा . [ नकटा द्वि . ]
-
adjective वह जिसकी नाक कटी हो
Ex. नकटी शूर्पनखा अपने भाई रावण के पास गई ।
Site Search
Input language: