|
वि. ५२ ही संख्या . न. उत्तम सोनें ; बावनकशी सोनें . बावनासि केवी कसवटी । उणें करुं शके । - कथा ४ . १६ . १३ . [ सं . पावन ] न. वांतीं ; ओकारी ; बासी बावन . [ सं . वमन ] न. उत्तम प्रकारचें चंदन ; मैलागरु चंदन . मोळिकारा धांडोळितां रानें । जेविं मोळिए जोडिलें बावनें । - ऋ १० . [ पावनाचा अपभ्रंश ; पावन = शुद्ध , पवित्र करणारा ; धूप . पावन हा शब्द चंदनाचा वाचक बनला असावा ] ०कस न. उत्तम सोनें . बावनकसाची नाणीं । - वेसीस्व ७ . ५७ . [ बावन + कस ] ०कशी वि. अतिशय शुद्ध व उत्तम ; बावन वेळां शुद्ध केलेलें ; ( सोन्याच्या शुद्धतेचे बावन कस धरले तर ) बावनहि कस ज्याचे उतरतात असें . सोनेंच बावनकशी न कसें म्हणावें । - र ६ . ( ल . ) पवित्र ; निर्दोष ; प्रामाणिक ; ( मनुष्य , पदार्थ इ० ). [ बावनकस ] ०खणी खाणी - स्त्री . ( पुणें . ) वेश्यांची गल्ली ( शुक्रवार पेठेंत खाजगीवाल्यांच्या पिछाडीस बावनखणांची एक चाळ होती . तींत वेश्या राहात असत त्यावरुन ). ०बत्तिशा बाविशा - स्त्रीअव . बाराबाविशा पहा . ०बीर पु. एक देवता समूह . पराक्रमी किंवा हुषार इसम . ( नाग , निंदार्थी ) शूर ; पराक्रमी . म्ह० एक ठेंच खाई तो बावनबीर होई ; बावन ठेंचा खाई तो गद्धा होई . [ हिं . ] मातृका , मात्रुका - स्त्रीअव . ॐकारापैकीं अ , उ , म या तीन मात्रा व वरील बिंदु ही अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रा व त्या पासून पुढें बावन १६ स्वर व व्यंजनें मिळून ५२ मातृका . ॐकार आणि स्वर व व्यंजनें मिळुन ५२ मूळाक्षरें . आकार उकार मकार । अर्धमात्राचें अंतर । औटमात्रा तदनंतर । बावन मात्रुका । - दा १२ . ५ . ९ . [ बावन + मातृका अक्षर ] ०मुद्रा स्त्रीअव . चंदनाच्या गंधाच्या मुद्रा , ठसा . बावनमुद्रा बुद्धिसमुद्रा परखुणमुद्रा सुवर्णमुद्रा दे आमुच्या । - पला ४ . बावन्नी स्त्री . ( गो . ) पत्यांच्या खेळांत तेरा हात करुन मिळालेला विजय .
|