|
पु. राजादिकांची स्तुति करणारा ; स्तुतिपाठक ; भाट ; वैतालिक ( भाट प्रत्यक्ष दरबारांत येऊन राजाची स्तुति करतात व स्तुतिपाठक , वैतालिक , बंदीजन हे पडद्यांतून स्तुति करतात ). हातीं घेउनी पादुका । उभा बंदिजन तुका । - तुगा २७८ . [ सं . ] स्त्री. अडथळा ; प्रतिबंध ; मनाई . त्याला येथें येण्याची बंदी आहे . उपरम ; थांबविणें ; बंद ठेवणें ( काम , चाल ). रतीब ; उकाडा ( दूध , तूप इ० चा ). आमच्या येथें दोन शेर दुधाची बंदी आहे . तुरुंग ; कैद ; बंधन . पु. कैदी ; कारागृहांत ठेविलेला . [ सं . बंध ; फा . बंदी ] बंदी घालणें - तुरुंगांत , कैदेंत टाकणें . रावणें बंदीं घातलें इंद्रासी । - एभा ९ . १५ . बंदीखाना , शाळा - पुस्त्री . कारागृह ; तुरुंग . कामक्रोध बंदी खाणी । तुका म्हणे दिले दोन्ही . - तुगा २११३ . ०पाल पु. तुरुंगाधिकारी ; जेलर ०मुदत स्त्री. ठराविक , नियमित काल ( हुंडीच्या फेडीचा ); तारखेपासूनची मुदत . याच्या उलट कच्ची , खुली मुदत . ०मोक्ष पु. बंधनांतून सुटका . वान , स्थ पु . कैदी .
|