Dictionaries | References

डोंगर

   
Script: Devanagari

डोंगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the hills. As villagers, fleeing from the Penḍhárís or other marauders, were wont to do.

डोंगर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hill. Used fig. of an arduous work, a heavy calamity &c.
डोंगराचे आंवळे व सागराचें मीठ   Improbabilities become sometimes realities.
डोंगर पोखरून उंदीर काढणें   Much ado about nothing.

डोंगर     

ना.  घाट , टेकडी , पहाड , लहान पर्वत ;
ना.  ढिगारा , ढीग , ढेर , रास .

डोंगर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पर्वत

डोंगर     

 पु. १ लहान पर्वत ; टेकडी ; पहाड ; घाट . २ ( ल . ) मेहनतीचे काम ; काळजी करण्यासारखा आजार ; कर्जाचा बोजा , पाप , गुण , संकट , त्रास यांचे आधिक्य . ३ ( ल . ) काजळाचा गोळा , रास ( भांड्याच्या बुडावर धरलेली ) . ४ ( को . ) डोंगराळ मुलुखांत प्रथम नाचणी पेरलेले शेत . ५ ( कों ) शुष्क ; डोंगराळ प्रदेश ; नाचणी , वरी यांसारख्या पिकांच्या उपयोगी जमीन . [ प्रा . डुंगर ; गु . डुंगर ] ( वाप्र . ) डोंगर खणून ( पोखरुन ) उंदीर काढणे - अचाट परिश्रम करुन त्याची फलश्रुति फारच अल्प झालेली दाखविणे . डोंगरावरुन उडी टाकणे - क्षुल्लक गोष्ट करणे . उदा० हलकी देणगी देणे . डोंगरी दिवा लावणे - ( पेंढारी , लुटारु इ० ना भिऊन ) डोंगरात जाऊन राहणे ; वस्ती करणे . म्ह ० १ डोंगरास दुखणे आणि शिंपीत औषध . २ दुरुन डोंगर साजरा . सामाशब्द -
०कठडा   कठाड कठाडी कांठ किनारा - पु . डोंगराची कड , हद्द , सीमा ; डोंगराच्या पायथ्यांच्या , आसपासचा प्रदेश . डोंगरकठाड्याचे गांवास रान लगत पडले .
०कणगर   कंगर पु . डोंगर पर्वत ; डोंगराळ मुलुख ; टेकड्या .
०करी वि.  डोंगरी ; डोंगरात राहणारे . डोंगरकरी कोण आहेत .... यांची जोराची चवकशी चालू केली . - अस्पृ . ४ .
०कोळी  पु. डोंगराळ मुलुखातील एक जात व तींतील व्यक्ति .
०खिंडी  स्त्री. खिंडीतील अरुंद मार्ग ; घाट .
०गाव   पुन . डोंगरावरील डोंगरामधील गांव . डोंगरत क्रिवि . ( व . ) उत्तरेस , उत्तरेकडेस तो डोंगरात गेला .
०दळे  न. जंगल तोडून लागवडीस आणलेली डोंगरावरील जमीन .
०पठार  स्त्री. डोंगराच्या माथ्यावरचा सपाट प्रदेश .
०रान  न. डोंगराळ प्रदेश . मुलुख .
०वट   डोंगराळ - वि . डोंगरांनी युक्त ; डोंगरी ; डोंगरासंबंधी , खडकाळ , ( प्रदेश ); पहाडी .
डोंगरट   डोंगराळ - वि . डोंगरांनी युक्त ; डोंगरी ; डोंगरासंबंधी , खडकाळ , ( प्रदेश ); पहाडी .
०सरा   सरी - डोंगरांची , टेकड्यांची रांग . डोंगराचे लवण - न . डोंगरातील वळण अथवा वांकण . डोंगरी - स्त्री . १ लहान डोंगर ; टेकडी . २ डोंगरी कापड पहा . - वि . १ डोंगरांवर पिकणारे , होणारे . २ डोंगरांनी युक्त ; डोंगराळ . ३ डोंगरासंबंधी . [ डोंगर ]
०कापड   २ ( ल . ) हलक्या जातीचे व दराचे कापड . इंग्रजीतहि डुंगरी या नावानेच हे कापड प्रसिद्ध आहे .
०ऊंस   डोंगरी - पु . एक जातीचा ऊंस . - कृषि ४५० .
०किल्ला  पु. मुंबईचा फोर्ट जॉर्ज किल्ला .
०बागायत  न. ( कों . ) डोंगराच्या उतारावरील बागाईत .
०मिरी  स्त्री. ( राजा . ) काळी मिरी , मिर्‍यांची एक जात .

डोंगर     

डोंगर खणून (पोखरून) उंदीर काढणें
अचाट परिश्रम पण त्‍याची फलश्रुति फारच अल्‍प.
अल्‍प फायद्यासाठी फार मोठी यातायात.

Related Words

डोंगर विलो अनि उंदीर जालो (गो.)   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   डोंगराक सुत घालां, आयल्‍यार डोंगर आयलो, ना जाल्‍ल्‍यार सूत गेलें   उरी डोंगर घेणें   ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात   राईचा डोंगर करणें   इकडचा डोंगर इकडे करणें   इकडचा डोंगर तिकडे करणें   इकडला डोंगर इकडे करणें   इकडला डोंगर तिकडे करणें   दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा   डोंगर   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा)   डोंगर व्याला, उंदीर झाला   सुतान डोंगर खेडावप   डोंगर कोरला, उंदीर काढला   डोंगर कोरून उंदीर काढला   डोंगर पोखरला, उंदीर निघाला   डोंगर पोखरून उंदीर काढणें   डोंगर पोखरून उंदीर काढला   डोंगर फेंसा   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   काजळाचा डोंगर   काडीआड डोंगर   दुःखाचे डोंगर, पर्वत   दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे   दुरून डोंगर साजरा   पायाखालीं जळतें आणि डोंगर विझवावयास वांवतो?   salt range   mountain cork   टेंकड   टेंकडें   सासमा गुडो करता, मुयेची हस्ति करता   टेकडी   शेताचें झाकड (ण) पाड व घराचें झाकण स्त्री   दुरुन   दडग   खोपाड   आगरडोंगर   टेंकडी   कांटवळ   ब्रह्मगिरी   रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   तैलबैला   विष्णुगिरी   शिवगिरी   दोंगुल्ली   गिर्यारोहण   खरल खोचल   चढणीस घोडा, उतरणीस रेडा   तुंगार   मोडावळ   दूरस्था (दूरतः) पर्वता रम्याः ।   नेआहा   पाय घटि आसल्यरि गुडो चडयेद, मन घटि आसल्यारि खयीं चडयेद   गिरिकंदर   गुड्डो   खोपड   टेकड   टेकडें   टोंगी   डांगे   काठवण   काळीज ठिकाणी नसणें   उभाळा   कनाळ   ओडंबर   माळाचा कडा अन्‌ गरिबाचा बोडा, फार पिकतो   मृगयावन   धुनकणें   धुनुकणें   दोंगरकडासी   कोहंक   कोहक   राईचा पर्वत करणें   हाता तोंडाशीं गांठ पडणें   ढिगारा   कडाडोंगर   कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी   कपार   रजाचा गज करणें   मढी   हती पादता (पात्ता) हती पादता (पात्ता) फुस्स   टिकोरणें   टिकोरें   वणवा   cline   गूड   चढाऊ   टिकोरा   टेकूड   काडीआड मर्यादा   इंजनेर   इंजिनियर   इंजिनेर   इकडचा   इकडला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP