Dictionaries | References

आत्म

   
Script: Devanagari

आत्म     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : निजी

आत्म     

वि.  
आत्म्यासंबंधींचें .
स्वत : चें ; आपलें . [ सं . ]
०कार्य  न. आपलें काम ; स्वत : चें काम . - क्रिवि . खासगी कामाकरितां ; आपल्या कामासाठीं ( व्यापारी लोकांच्या पत्रव्यवहारांत हा शब्द येतो ). हें अप . रुप आहे .
०ख्याति   ख्याति पहा .
०गत वि.  स्वगत ; आपल्याशीं ( नाटकांत एखाद्या पात्रानें केलेलें भाषण ).
०गति  स्त्री. 
आत्म्याची अखेरची अवस्था .
आपली अखेर . प्रिये आत्मगति यांची दिसताहे । - सप्र १३ . १४ .
०ग्रह  पु. 
आत्मज्ञान .
स्वीकार करणें ; स्वत : चें मानणें ; आपला म्हणणें ; कैवार घेणें .
०घात  पु. 
आत्महत्या ; स्वत : चा घात , नुकसान ( धर्मशास्त्रविहित प्राणत्यागास हा शब्द लावीत नाहींत ). तंव तो वशिष्ट गुरुनाथ । म्हणे सहसा न करावा आत्मघात ।
०घातक   घातकी घाती - वि .
स्वत : चा घात करणारा .
( ल . ) स्वत : चें नुकसान करणारा ; स्वत : च्या पायांवर धोंडा पाडून घेणारा .
०घ्न वि.  
आत्महत्या करणारा .
आत्मघातकी .
०चर्चा वि.  आत्म्यासंबंधीं वादविवाद ; ब्रह्मविचार ; आत्मानात्मविचार . [ सं . ]
०च्छाया  स्त्री. स्वत : ची सावली . कां कवळिलिया न धरे । आत्मच्छाया ॥ - ज्ञा १८ . ५३० . [ सं . ]
०ज  पु. स्वत : पासून जन्मलेला ; पुत्र ; मुलगा . पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल के । - ज्ञा ५ . ९३ .
०जा  स्त्री. स्वत : ची मुलगी . अगा आत्मजेच्या विषी । - ज्ञा १२ . १३२ .
०जिज्ञासु वि.  आत्मज्ञानाची इच्छा करणारा . ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । - ज्ञा १६ . ५२ .
०तत्त्व  न. ब्रह्मज्ञान ; आत्मज्ञान . येर आत्मतत्त्व उदासीन - ज्ञा १८ . ३०६ .
०तोख   तोष - पु . आत्मानंद ; स्वसंतोष .
०त्याग  पु. स्वार्थत्याग . हा आत्मत्याग व लोकाश्रय सरकारचे गुप्त हेतु पर्यायानें सिध्दीस नेण्यास जर उपयोगी पडला ... - टि ३ . १८२ .
०त्व  न. आत्मस्वरुप . न लगती तपें व्रतें अनुष्ठान । आत्मत्वाची खूण वेगळीच - ब . १७९ .
०धन  न. 
स्वत : ची संपत्ति .
स्वत : चा आत्मा ; स्वत :
( ल . ) स्वत : चा पुत्र .
०निंदा  स्त्री. स्वत : ची निंदा ; स्वत : स दोष देणें ; स्वत : वर दोषारोप करणें ( पश्चातापाच्या वेळीं ).
०निवेदन  न. आत्मसमर्पण ; परमेश्वराच्या ठिकाणीं स्वत : स वाहून घेणें ; नवविधाभक्तींतील शेवटचा - नवव्या भक्तीचा प्रकार , म्हणजे जीवशिवैक्य . आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा । - दा ८ . ८ . १३ .
स्वत : ची कथा , खुलासा ; आत्मचरित्र .
०निश्वास  पु. वेद ( यस्य नि : श्वसितं वेदा := वेद ज्याचे ( परमेश्वराचे ) नि : श्वास आहेत या वाक्यावरुन ).
०निष्ठ वि.  
आत्मस्वरुपीं तल्लीन असलेला ; आत्मानंदीं , ब्रह्मानंदीं निमग्न असलेला .
मनोभावाचा ; कळकळीचा ; उत्सुक .
०निष्ठा  स्त्री. 
आत्म्याच्या ठिकाणीं निष्ठा .
स्वत : वर विश्वास ; आत्मविश्वास .
०परिचय  पु. आत्म्याविषयींचें किंवा स्वत : विषयींचें ज्ञान - ओळख .
०पोटी वि.  अप्पलपोट्या ; स्वार्थी . तव भीम म्हणे श्रीकृष्णासी । तूं बरवा आत्मपोटी कळलासी । मी अतिथी उभा असता द्वारासी । भोजन सावकाश करिसी तूं । - जै १० . २ .
०प्रचीति   प्रतीति - स्त्री .
आत्मज्ञान ; स्वप्रतीति , गुरुप्रतीति , आत्मप्रतीति या तीन प्रतीतींपैकीं एक .
स्वत : च्या अनुभवावरुन मिळविलेलें ज्ञान - बोध ; आत्मानुभव . नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित । - दा १ . १ . १५ .
०प्रशंसा  स्त्री. स्वत : ची स्तुति ; आत्मस्तुति - श्लाघा .
०प्राप्ति   लाभ - स्त्रीपु . आत्मज्ञान ; ब्रह्मज्ञान . महामंत्र आत्मप्राप्तीची खाणी ।
०बंधु  पु. स्वत : चा नातेवाईक ; चुलत - मावस - आते - मामे भाऊ .
०बिंब  न. 
प्रतिबिंब . का आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं । - ज्ञा १८ . १३०६ .
जीवात्मा ( परमात्म्याचें प्रतिबिंब ).
०बोध  पु. आत्मज्ञान . मग सत्त्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे । - ज्ञा १८ . २१० . आत्मंभरी वि . अप्पलपोट्या .
०यज्ञ  पु. स्वार्थत्याग ; जीविताचें बलिदान ; स्वत : मरणाला तयार होणें .
०राज  पु. आत्मा ; स्वत : तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु । - ज्ञा १८ . २८० .
०रुप  न. स्वस्वरुप . जयजय स्वसंवेद्या आत्मरुपा । - ज्ञा १ . १ .
०लिंग  न. 
आत्मस्वरुप . पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें । - ज्ञा १८ . १३६९ .
शिवाचें मुख्य लिंग ( प्रतीक ). शंकरानें आपल्या भक्तासाठीं आत्मस्वरुपाचा तत्त्वांश मूर्त करुन ठेवला आहे .
अत्यंत जिवलग मनुष्य ; प्रेमाचें माणूस . एकें दिवशीं बाजीरावसाहेब हे नानासाहेबास भोजनाचे वेळीं बोलले कीं , रघुनाथराव यांचे पूर्वज विठ्ठल शिवदेव हे आमचे दादासाहेबांचे आत्मलिंग होते . - तीर्थयात्राप्रबंध ८२ .
०वत वि.  आपल्या प्रमाणें ; स्वत : सारखें ; भेदभाव , आपपरभाव न ठेवितां . आत्मवत सर्व भूतानि । या वचनावरुन . आत्मवत देखावे अवघे जन । नसो देहभान किंचित ।
०वश   मनोनिग्रह ; आत्मनिग्रह - आत्मसंयमन .
०विचार  पु. आत्म्यासंबंधी चर्चा ; ब्रह्मविचार . संतसंगे आत्मविचार .
०विद्या  स्त्री. 
ब्रह्मविद्या ; अध्यात्मविद्या ; वेदांत .
आत्मज्ञान ; स्वत : संबंधीं जाणीव .
०विधि  पु. आत्म्याचें कर्तव्य , गुणधर्म . ऐका चित्त देऊन आत्मविधि । वेत्ता पु . ज्याला स्वस्वरुपाची पूर्ण ओळख झाली , स्वह्रदयांत वास करणारा ब्रह्मांडव्यापी परमात्मा आपण आहों असा ज्याच्या बुध्दीचा निर्धार झाला तो ; मी ब्रह्म आहे असें मानणारा .
०शास्त्र  न. अध्यात्मविद्या - शास्त्र .
०शुध्दि  स्त्री. चित्तशुध्दि ; स्वत : चे आचारविचार , वर्तन शुध्द ठेवणें . म्ह० आधीं आत्मशुध्दि मग देवशुध्दि .
०संतोषानें   क्रिवि . राजीखुशीनें ; कोणाची भीड न धरतां ; आपखुषीनें . हें खत मी आत्मसंतोषानें लिहून दिलें असे .
०संतोषी वि.  
आत्मानंदांत सुख मानणारा .
( ल . ) आपमतलबी .
०सत्ता  स्त्री. ब्रह्मज्ञान ; आत्मस्वरुप . तैसें होईजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये । - ज्ञा १५ . ३८० .
०संयम   आत्मवश पहा .
०साधन  न. 
आपल्या जीवाचें किंवा जन्माचें सार्थक करणें . जैसि संताचि कास मुमुक्षु नर । धरिति आत्मसाधना ।
स्वत : च्या उपजीविकेची व्यवस्था - तरतूद .
( ल . ) स्वत : चा मतलब . त्याचें कांहींतरी आत्मसाधन असेल तरच तो इतकी खटपट करितो .
०साक्षात्कार  पु. निर्गुण साक्षात्कार ( सगुण साक्षात्काराच्या उलट ); अंतर्यामीं परमेश्वर - ब्रह्म याचें दर्शन होणें .
०सुख  न. स्वत : चें ( शारीरिक किंवा मानसिक ) सुख ; आपल्या ठिकाणींच सुख ; ब्रह्मज्ञानापासून होणारें सुख .
०स्तुति  स्त्री. स्वत : ची प्रशंसा ; आत्मप्रशंसा . आत्मस्तुति मनांतून । स्वप्नीं जयासि नावडे । स्थिति स्त्री . ब्रह्मस्वरुपाची स्थिति ; आत्म्याची स्वतंत्र अवस्था ; शरीर किंवा इतर वस्तू यांहून भिन्न अशी अलिप्त स्थिति . कांहीं वाक्यप्रचार - आत्मस्थिति ओळखावी - जाणावी - संपादावी - जोडावी - धरावी = सोडूं नये ; आत्मस्थितीवर असणें .
०हत्त्या  स्त्री. 
( कायदा ) शास्त्रविधिविरहित स्वत : स मरण येईल असें कृत्य स्वत : करुन मरणास कारण होणें ; हेतुपुरस्सर स्वत : चा जीव स्वत : घेणें ; आत्मनाश ; आत्मघात .
आत्महत्येचें पाप , गुन्हा .
०हत्यारा वि.  आत्मघात करणारा . जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी । - दा १७ . ७ . १० .
०हित  न. 
( ईश्वरप्राप्तीनें होणारें ) जीवाचें कल्याण ; देहाचें सार्थक ; भगवतप्राप्ति . आहा नरदेह उत्तम पूर्ण । केवळ भगवतप्राप्तीचें स्थान । म्यां आत्महित न करुन । बुडालों किं अंधतमीं ।
स्वत : चा फायदा .
०ज्ञान  न. 
ब्रह्मज्ञान ; स्वस्वरुपाचें ज्ञान ; अध्यात्मज्ञान . ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण । - दा ५ . ६ . १ .
स्वत : च्या वर्तनाची जाणीव . म्ह० आधीं आत्मज्ञान , मग ब्रह्मज्ञान .

आत्म     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : निजी

आत्म     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आत्म   (in comp. for आत्म॑न्; also rarely ifc.e.g.अध्य्-आत्म, अध्य्-आत्म॑म्).

Related Words

आत्म-समर्थन   आत्म सम्मान   आत्म-विकास   आत्म चेतना   आत्म   आत्मसमर्थन   आत्म एव आत्मनः शत्रुः   आत्म कथन   आत्म कथा   आत्म कहानी   आत्म-केंद्रित   आत्म-केन्द्रित   आत्म-गौरव   आत्म चरित्र   आत्म ज्ञान   आत्म तत्व   आत्म-योनि   आत्म-रक्षा   आत्म वंचक   आत्म वंचना   आत्म विषयक   आत्म शक्ति   आत्म-संबंधी   आत्म-संभव   आत्म-सम्भव   आत्म हत्या   आत्मविकास   आत्मसम्मान   self-defense   আত্মসমর্থন   आत्मसमर्थनम्   پَنٕنۍ مدَد   ଆତ୍ମସମର୍ଥନ   ਆਤਮ-ਸਮਰਥਨ   આત્મ-સમર્થન   ಆತ್ಮ-ಸಮರ್ಥನೆ   self defence   self protection   ego   egotism   আত্মবিকাশ   आत्मविकसन   आत्मसन्मान   आत्मसम्मानः   پنٕنۍ ترقی   ଆତ୍ମ-ବିଶ୍ବାସ   ଆତ୍ମ-ସମ୍ମାନ   ਆਤਮ ਸਨਾਮਨ   ਆਤਮ-ਵਿਕਾਸ   આત્મ-વિકાસ   ಆತ್ಮ ಗೌರವ   subjectiveness   subjectivity   আত্মসম্মান   गाव मोन्दांथियारि   دٲخلِیَت   சுயவுணர்வு   ആത്മചേതന   ఆత్మచేతన   ଆତ୍ମଚେତନା   ਆਤਮ ਚੇਤਨਾ   આત્મ ચેતના   આત્મ-સન્માન   ಆತ್ಮ ಚೇತನ   আত্মচেতনা   आत्मचेतना   self-importance   चेतना   sado-masochism   self-comprehension   self-development   self-identification   self-rating   economic self-sufficiency   self-criticism   निजसम्मान   स्व चेतना   स्वसम्मान   अज्ञानबोधिनी   बौद्धधिक्कार   प्रत्ययात्म   autobiography   आत्मवित्ता   जिनलाभ   णेष   self-determination   ब्रह्मदेयात्मसंतान   प्रत्ययिक   नाथस्तुति   myself   concentre   auto   घष   अत्रिसुत   चपलात्मक   टाकली सांड करणें   टिपणबाज   णास   self-examination   self-knowing   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP