-
उ.क्रि. १ पुरे करणे ; पार पाडणे ; तडीस नेणे ( एखादे केलेले काम , चुका दुरुस्त करुन , अपुरेपणा काढून टाकून , सफाई - जिल्हई देऊन म्हणजे पुन्हां पहिल्यापासून करुन ); चूक सुधारणे . २ निष्कृति करणे ; सांवरणे ( केलेले दुष्कृत्य सुधारण्यासाठी प्रायश्चित , शिक्षा , दुःख इ० भोगून , त्याचा बरे वाईटपणा सोसून - एखादे काम , कारभार ); दुष्कर्माची फळे भोगणे . ३ ( सामा . ) पार पाडणे . हे तूं व्यभिचाररुप कर्म करितोस परंतु निस्तारायास तूं नरकांत जाशील . - अक्रि . सुखरुपपणे पार पडणे . तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल । - ज्ञा ३ . १६६ . [ सं . निस्तरण ]
-
क्रि. तडीस नेणे , पार पाडणे , पुरे करणे ( त्रुटी दूर करून );
-
क्रि. दुरुस्त करणे , सावरणे ;
-
क्रि. दुष्कर्माची फळे भोगणे , परिणाम स्वीकारणे .
Site Search
Input language: