|
अ.क्रि. विष इ० उतरणें , नाहीसें होणें , शमणें . सवर्म ह्रदय कल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना । - ज्ञा २ . ७१ . [ सं . भंजन ] उ.क्रि. भागणें ; विभागणें ; वांटणी , भाग करणें . ( गणित ) भांजणी करणें . [ सं . भाजन ] भाजक - वि . विभागणारा ; भाग करणारा . भागणारी संख्या ; जिनें भाज्याला भागावयाचें ती संख्या . [ सं ] भाजणी , भांजणी - स्त्री . ( गणित ) विशिष्ट वजाबाकी किंवा भागाकार ; हलक्या परिमाणाच्या अंकास भारी परिमाणाचें रुप देणें किंवा भारी परिमाणाच्या अंकास हलक्या हलक्या परिमाणाचें रुप देणें . ह्याचे दोन प्रकार आहेत - उतरती भांजणी व चढती भांजणी . वांटणी ; वांटप ; विभागणी . कोळपणी ; वखरणी . ( अशिष्ट ) बिघडविणें ; खराबी करणें ; विचका करणें . ( क्रि० मारणें ). वर्ग ; भेद . राजस तामस सत्वगुणी । देवा दानवांची भांजणी । - कथा ४ . ५ . १७७ . भांजणी खांजणी , नी - स्त्री . क्षयवृद्धि . भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही । - तुगा ३९१५ . भाजित - वि . ( गणित ) भागलेला ; भागला गेलेला . विभागलेला ; वांटणी , वांटप केलेला . भाज्य - न . ( गणित ) भाजकानें जिला भागावयाचें ती संख्या . - वि . विभागण्यास योग्य , जरुर , शक्य ; ज्याची वांटणी करावयाची आहे असें . [ सं . ] ०रेषा स्त्री. दोन भाग निरनिराळे दाखविणारी रेषा ; ( इं . ) लाईन ऑफ डिमार्केशन .
|