-
पु. १ पादकंदुक क्रीडेमध्यें डाव होण्याकरितां हद्दीवरील दोन खांबांमधील ज्या रेषेंतून चेंडू दवडाचा लागतो ती रेषा . ( क्रि० करणें . ); डाव . २ ध्येय . [ इं . गोल ]
-
पु. १ गोलक ; वर्तुळाकार , वाटोळी , वर्तुळस्तंभाकार , वरवंटयासारखी वस्तु ; ज्या भरीवाच्या पृष्ठावरील बिंदु मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात तो ; गोळा . २ मंडळ ; वर्तुळ ; परिधिवृत्ताकार आयत . ३ कृत्रिम गोल ; वर्तुळ ; खगोल , भूगोल , दृग्गोल पहा . ४ गोलदार दांडा , वांसा ; चरकावर केलेला गोलदार दांडा . ५ वर्तुळपणा ; वर्तुलत्व ; लंबवर्तुलत्व . ६ ( चेंडू दांडू खेळ ) लाकडी चेंडू . ७ नक्षीदार कांठ , पदर ( पागोटयाचा ). ८ घोळ ; थवा ; जमाव ; कळप ; झुंड . ९ सैन्याची एक रचना . चौफेर बांधुनी गोल । - संग्राम ६० . १० लोंढा ; झोल ; डोंब ( आगीचा ). ११ राशीचक्रमंडलाचा एक भाग किंवा अर्ध . वृषभराशीचा ग्रह उत्तरगोलांत जाणावा . १२ फुलांचा गुच्छ , झुबका , गोटा . तुरा पहा . १३ नदींतील एक मासा . १४ गोफ , करगोटा यांच्या पदराची एक तार ( सोनें , चांदीची ). १५ ( विणकाम ) वशारन्याच्या सांधीच्या सांधीच्या कैचींत घालण्याच्या उपयोगी . सागवानी २॥ - ३ हात लांबीची वाटोळी काठी . १६ गोळा , तोफेचा गोळा . - वि . वाटोळा ; वर्तुळाकार ; लंबवर्तुळागार ; वर्तुलस्तंभाकार . [ सं . ] सामाशब्द -
-
०कल्प ज्या गोलाच्या समोरासमोरच्या दोन बाजू चपटया किंवा फुगलेल्या असतात तो .
-
०चवडशी स्त्री. ( कासार ) भांडें घडवितांना ठोकठोकून , कमजास्त जाड असेल तेथें सारखें करण्याचा चौरस हातोडा .
Site Search
Input language: