-
न. १ वृक्ष ; झुडुप ; रोप ; वनस्पति ( लहान , मोठी ). तूं फिरलास झाडोझाड मीं फिरलों पानोपान . = तुझ्या पेक्षांहि मला जास्त माहिती आहे . २ शाखायुक्त वस्तु , पदार्थ ; वृक्षाकार वस्तु . ३ मेणबत्ती इ० लावण्याचें कांचेचें झुंबर ; पुष्कळशा उदबत्त्या लावण्याचें वृक्षाच्या वाकाराचें धातूचें घर . चांदीच्या झाडांतून उदबत्त्या खोंविल्या होत्या . - अस्तंभा १३६ . ४ दारूकामांतील एक प्रकार ; वृक्षाच्या आकाराचें दारूकाम . ५ भूतानें पछाडलेलें माणूस . ज्यास भूत पछाडतें त्या झाडास तें सुग्रास अन्न खाऊं देत नाहीं . - अस्तंभा ५८ . ६ वंशवृक्ष ; वंशावळ . ७ ( कु . ) बंदुकीचा लांकडी भाग , दस्ता . [ स . झाट ; प्रा . झाड ] ( वाप्र . )
-
०उभें उत्कृष्ट रीतीनें एखादें काम वठविणें . उदा० गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० इतक्या उत्तम शैलीनें करणें , रंगविणें कीं जणुं काय तें करणारा , एक विशाल व फळाफुलांनीं युक्त असा वृक्षच उभारीत आहे असें वाटावें . कोण्या झाडाचा पाला - एखाद्याचा दिमाख , नक्षा मगरूरी उतरण्याकरितां , उध्दटपणाची लुडबुड थांबविण्याकरितां , अभिमान , अधिकार झिटकारण्याकरितां योजावयाचा शब्द ; अशा माणसाविषयीं क्षुद्रता व तिरस्कार दाखविणारा शब्दसमूह . सुभेदार ? हं ; सुभेदार म्हणजे कोण्या झाडाचा पाला ? आम्ही ओळखीत नाहीं असें जाऊन सांग जा ? - नाटयकथार्णव . झाडाचे राऊत दिसणें , झाडाचे राऊत - भीति इ० कामुळें झाड घोडेस्वार इ० कांच्या आकृतीप्रमाणें दिसणें ; दोरीचा साप बनविणें ( बायबलांत सुध्दां अशीच कल्पना जजेस ९ . ३६ . मध्यें दृष्टीस पडते ). झाडावरचें भूत - ( ल . ) ज्याचा नामनिर्देश करणें अनिष्ट आहे अशा नीच , तिरस्करणीय मनुष्याबद्दल वापरावयाचा वाक्प्रचार . सुक्या झाडास वाक लावणें , सुक्या झाडास वांक लावणें - ( सुकलेलें झाड इष्ट त्या दिशेनें वांकवितां येणें शक्य नाहीं यावरून ल . ) एखाद्या वृध्दास उपदेश करणें , हट्टी , हटवादी , पूर्वग्रहदूषित माणसास बोध करणें ( पालथ्या घागरीवरच्या पाण्याप्रमाणें आहे ). सामाशब्द . झाडकी - स्त्री . किर्र झाडी .
-
करणें उत्कृष्ट रीतीनें एखादें काम वठविणें . उदा० गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० इतक्या उत्तम शैलीनें करणें , रंगविणें कीं जणुं काय तें करणारा , एक विशाल व फळाफुलांनीं युक्त असा वृक्षच उभारीत आहे असें वाटावें . कोण्या झाडाचा पाला - एखाद्याचा दिमाख , नक्षा मगरूरी उतरण्याकरितां , उध्दटपणाची लुडबुड थांबविण्याकरितां , अभिमान , अधिकार झिटकारण्याकरितां योजावयाचा शब्द ; अशा माणसाविषयीं क्षुद्रता व तिरस्कार दाखविणारा शब्दसमूह . सुभेदार ? हं ; सुभेदार म्हणजे कोण्या झाडाचा पाला ? आम्ही ओळखीत नाहीं असें जाऊन सांग जा ? - नाटयकथार्णव . झाडाचे राऊत दिसणें , झाडाचे राऊत - भीति इ० कामुळें झाड घोडेस्वार इ० कांच्या आकृतीप्रमाणें दिसणें ; दोरीचा साप बनविणें ( बायबलांत सुध्दां अशीच कल्पना जजेस ९ . ३६ . मध्यें दृष्टीस पडते ). झाडावरचें भूत - ( ल . ) ज्याचा नामनिर्देश करणें अनिष्ट आहे अशा नीच , तिरस्करणीय मनुष्याबद्दल वापरावयाचा वाक्प्रचार . सुक्या झाडास वाक लावणें , सुक्या झाडास वांक लावणें - ( सुकलेलें झाड इष्ट त्या दिशेनें वांकवितां येणें शक्य नाहीं यावरून ल . ) एखाद्या वृध्दास उपदेश करणें , हट्टी , हटवादी , पूर्वग्रहदूषित माणसास बोध करणें ( पालथ्या घागरीवरच्या पाण्याप्रमाणें आहे ). सामाशब्द . झाडकी - स्त्री . किर्र झाडी .
-
झाड उभें करणें
Site Search
Input language: