-
पु. १ एक मोठे चर्मवाद्य , नगारा ; भेरी ; पडघम . २ ( ल . ) मोठे पोट ; दोंद . ३ ( ना . ) निंदाव्यंजक संबोधन . [ ध्व . सं . ढौल ; प्रा . ढोल्ल ; फा . दुहुल ] ( वाप्र . ) वाजत ढोलाने - राजरोस ; मोठ्या थाटाने ; उघडपणे ; निर्भयपणे ; जय जयकाराने .
-
पु. ( बे .) एक प्रकारचे चामड्याचें रणवाद्य ; करंढोल ( प्रा . करडी = एक वाद्य ; का . करडे = पखवाज ; कोन्हीकडून वाजणारा ढोल )
-
स्त्री. ( झाड , टेकडी , जमीन इ० मधील ) मोठे बीळ ; गुहा ; पोकळ जागा ; विवर ; भुयार . मग ते ब्रह्मगिरीचे शिखरी । औदुंबराचे ढोलांतरी । - कथा २ . १० . १३८ .
-
ना. डांगोरा , डिंडिम , ढोलक , ढोलकी , नगारा , पडघम , भेरी , रणढोल .
Site Search
Input language: