-
स्त्री. १ नेटाचा प्रयत्न ; जोराचा , निकराचा हल्ला ; घेगा . २ लढाईच्या वेळीं हल्ला करतांना आवेशानें ( हा वार घे अशा अर्थी ) योध्दे हा शब्द उच्चारतात . तोंडानें बोलुनि घे घे । - संग्रामगीतें ७६ . [ घेणें द्वि . ]
-
०मार पु. १ निकराचा , नेटाचा , जोराचा एकत्रितपणें प्रयत्न , हल्ला ; चोहोंकडून अनेकांचा पराकाष्ठेचा प्रयत्न . घेघेमार केला तेव्हां त्याचें घर विझालें . २ ( ल . ) हातघाईची लढाई ( कारण अशा वेळीं घे , घे , मार , मार अशी वीरश्रीची भाषा चालू असते ). - क्रिवि . घाईनें ; उतावीळपणानें ; मागें पुढें न पाहतां ; विचार न करितो ; संपत्ति येतांच घेघेमार घरें बांधलीं . घेघेमार लिहूं नका , विचार करून लिहा . घेघेमारी - स्त्री . १ घेघेमार पहा . २ दाणादाण . दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । - तुगा २३३९ . [ घे + घे + मार ]
-
f A determined, vigorous onset or effort.
-
A determined, vigorous onset or effort. 2 A word used by soldiers in shouting and rushing to the attack.
Site Search
Input language: