-
कदली (रंभा) कुल, म्यूझेसी
-
केळ (कदली)
-
रॅव्हॅनेला, हेलिकोनिया (ंजंगली केळ) चवेणी इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव हल्ली कदली गणात (सिटॅमिनी) करतात. परंतु हचिन्सन शुंठी (झिंजिरेलीझ) गणात करतात. प्रमुख लक्षणे- मोठ्या नरम (काष्ठ नसलेल्या) मिथ्या खोडाच्या वनस्पती, महाछद्रयुक्त संयुक्त फुलोरा, द्विलिंगी किंवा एकलिंगी, एकसमात्र, सम किंवा विषम प्रकारची परिदले असलेली फुले, बहुधा जुळलेल्या तीन परिदलांची दोन वर्तुळे, तीन केसरदले फलनक्षम व दोन वंध्य, तीन जुळलेल्या किंजदलांच्या अधःस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक किंवा अनेक बीजके, मृदुफळ किंवा बोंडात सपुष्क व परिपुष्कयुक्त बिया
-
Scitamineae
Site Search
Input language: