मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|वारांचा आरती संग्रह| वारांचा आरती संग्रह कर्हेच्या पाठारीं नांदे ... आधार चक्र नृत्य मांडिलें ... चिंतामणी परिपूर्ण देवाधि ... एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही... निर्गुण गुणवंत तूं विघ्नह... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा... पुजेच्या प्रांतीं अभ्यंग ... आरती सोमवारची - आधार चक्र नृत्य मांडिलें ... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती. The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratimondaymorya gosaviआरतीमोरया गोसावीसोमवार आरती सोमवारची Translation - भाषांतर आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥ कड कड कड कड आकाश तडके दारुण ॥ गड गड गड गर्जे गर्जे गगन ॥ चळ चळ चळ चळ पृथ्वी कापे त्रिभुवन ॥ धिग धिग धिग नृत्य करि गजानन ॥जयदेव ॥३॥ तेहेतिस कोटि देव वर्णिति सीमा ॥ परमानंद पूर्ण ब्रम्ह परमात्मा ॥ अगणित गुण सागर भाळीं चंद्रमा ॥ नातुडें सुरवरां नकळे महिमा ॥जयदेव ॥४॥ ऐसें तांडव नृत्य झालें अद्भुत ॥ हरि हर ब्रह्मादिक उभे तटस्थ ॥ मोरया गोसावी योगी ध्यानस्थ ॥ एकरुप होउनि ठेले द्वैता अद्वैत ॥जयदेव ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP