• Register

जानवे म्हणजे नेमके काय ?

692 views
asked Jul 5, 2016 in Hindu - Traditions by TransLiteral (9,380 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो.
दुसर्‍यावर अग्नी असतो.
तिसर्‍यावर नवनाग असतो.
चौथ्यावर सोम
पाचव्यावर पितर
सहाव्यावर प्रजापती
सातव्यावर वायू
आठव्यावर सुर्यनारायण
नवव्यावर विश्वदेव
त्याचे तिन दोर्‍याचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात.
असे नऊ सुत्रिचे तीन पदर म्हणजेच सत्व, रज, तम हे तीन गुण मिळवून ९६ आन्गुळे दोरा लांब असतो.
नंतर त्याची ब्रह्मगाठ दिलेली असते. ही अद्वैताची गाठ म्हणजे जिव व ब्रम्ह एकच आहे.
म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतिक आहे.
४ वेद
६ शास्त्र
अठरा पुराणे जिवो ब्रह्मैव ना पर हिच शिकवण देतात.
१५ कला
१२ मास
७ वार
२७ नक्षत्र

प्रकृती
पुरुष
महतत्व
अहंकार
पंच महाभुते
पंच विषय
पंच ज्ञानेद्रिय
पंच कर्मेंद्रिय
व मन
एकूण २५ आणि ४ वेद ३ काळ ( उन्हाला हिवाळा व पावसाळा ) व रज सत्व तम हे तीन गुण मिळवून ९६ होतात म्हणून जानव्याला ९६ बोटे लांब दोरा असतो.
माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात...
तो गुण नवरत्नाकारू !
यया नवरत्नाचा हारू !
न फेडितले दिनकरू !
प्रकाश जैसा !
answered Jul 5, 2016 by TransLiteral (9,380 points)
selected Aug 24, 2016 by TransLiteral Admin
...