• Register

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?

550 views
asked Apr 15, 2014 in Hindu - Traditions by TransLiteral (9,340 points)
edited Apr 15, 2014 by TransLiteral

1 Answer

0 votes
उद्दालक आरूणी हा उपनिषद्‍ साहित्यात आणि महाभारतात वर्णिलेला अध्यात्मविद्येचा सुविख्यात आचार्य. हा आणि याचा पुत्र श्वेतकेतु हे विवाहसंस्थेचे आद्यजनक मानले जातात.

एकदा एका निपुत्रिक ब्राह्मणाने त्या काळच्या रिवाजाप्रमाणे उद्दालक आरूणीची पत्नी पुत्रोत्पादनार्थ मागितली त्यावेळी प्रत्येक स्त्रीने एकच पती केला पाहिजे, असा नियम याचा पुत्र श्वेतकेतु याने केला, आणि अशा प्रकारे भारतीय विवाहसंस्थेचा पाया घातला गेला.

( नहाभारत आदिपर्व ११३: श्वेतकेतु )
answered Apr 15, 2014 by TransLiteral (9,340 points)

Related questions

...