• Register

नाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय?

532 views
श्रावण शुद्ध पंचमीस नागांची पूजा कां करतात?
asked Apr 15, 2014 in Hindu - Traditions by TransLiteral (10,920 points)

1 Answer

0 votes
पूरूवंशीय राजा परिक्षित् तक्षक नागाच्या दंशाने मृत झाला. कालांतराने आपला पिता कसा मृत झाला हा इतिहास त्याचा पुत्र जनमेजय याला समजला. तेव्हा आपल्या पित्याच्या मृत्युचा सूड घेण्यासाठी त्याने महान सर्पयज्ञ आयोजित केला. सर्पसत्रापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तक्षक इंद्राला शरण गेला. तेव्हा इंद्राने तक्षकाचे आणि स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी मनसेची प्रार्थना केली, तेव्हा हे सर्पसत्र थांबविण्याची मनसेने ( आस्तीकाची माता ) राजा जनमेजयाला आज्ञा केली.
जनमेजयाचे सर्पसत्र ज्या दिवशी बंद झाले तो दिवस ` नंदिवर्धिनीपंचमी 'चा ( श्रावण शुद्ध पंचमी ) होता. हा दिवस नागांना अत्यंत प्रिय असून आजहि नागपंचमीच्या या दिवशी नागांची पूजा केली जाते.
( भविष्य पुराण, ब्राह्मपर्व ३२ )
answered Apr 15, 2014 by TransLiteral (10,920 points)

Related questions

...