• Register

हिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा आणि चौदावा कां करतात?

4,570 views
हिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा अथवा चौदावा कां करतात? मला वाटते याला कांहीतरी कारण असावे. तेरावा म्हणजे पहिल्या दिवशी अथवा दहाव्या दिवशी जे लोक येतात त्यांच्या ऋणात आत्म्याने राहू नये म्हणून जेवणावळीचा कार्यक्रम करीत असावेत.
asked Apr 7, 2014 in Hindu - Beliefs by TransLiteral (10,920 points)

1 Answer

0 votes
हिंदू धर्मियांत असे समजले जाते कि, मृत माणसाचा आत्मा दहा दिवस पृथ्वीतलावर राहतो. त्याची हा लोक सोडून जाण्याची अजिबात इच्छा नसते. पण त्याला दुसरा जन्म घ्यायला जावेच लागते. म्हणून दहाव्या दिवशी पिंड करून सर्व इच्छा तृप्त होऊन आत्मा परलोकी दुसरा जन्म घेण्यासाठी मुक्त होतो.

तेरावा हा विधी नाही तर एक कृतकृत्य समारंभ असतो. मनुष्यप्राणी मृत पावल्यावर पहिल्या दिवशी लोक प्रेत घेऊन स्मशानात जातात. तिसरा दिवस अस्थि गोळा करून पाण्यात विसर्जित करतात. दहाव्या दिवशी पाणी घालण्यासाठी जमा होतात, त्या मृत मनुष्यासाठी वेळ, पैसा खर्च करतात. मृत मनुष्य या सर्वांच्या ऋणात राहू नये, त्याला मोक्ष प्राप्त व्हावा, म्हणून त्याच्या नावाने लोकांना जेवण देतात, जेणेकरून त्या आत्म्यावर ॠण राहू नये. शिवाय यादिवशी ज्यांना दुःख झाले आहे अशांचा दुखवटा काढतात.

चौदाव्या दिवशी ब्राह्मणाला बोलावून उदकशांती करून घर सुतकापासून मुक्त करतात.
answered Jul 8, 2014 by TransLiteral (10,920 points)
...