• Register

सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे ?

974 views
asked Dec 17, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,660 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
देवतांच्या पूजेत परिमल द्रव्य म्हणून अष्टगंधाचा उपयोग करतात. त्यात हळद व कुंकू ही दोन मुख्य गंधद्रव्ये आहेत. ‘ केदारविजय ’ या ग्रंथात असे सांगितले आहे की, अष्टगंध, निशिगंध, रक्तभोज, रक्तबीज, कोल्हापूर, जळसेना, चंद्रसेना या सर्वांचा संहार करण्यासाठी केदारनाथाचा अवतार झाला. रामप्रभूंनी रावण व कुंभकर्ण यांना मारल्यानंतर आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. त्यामुळे त्यांची ज्योत सभोवती फ़िरत होती. तेव्हा रामांनी त्यांना बजावले की, मी जेव्हा केदारनाथाचा अवतार घेईन त्यावेळी माझ्याशी विरोधी भक्ती करावी म्हणजे तुम्हांला मोक्ष प्राप्त होईल. रामानी अवतार घेतल्यानंतर राक्षसांचा वध केला. त्यात जलसेना व चंद्रसेना यांचा वध झाला. त्या पतिव्रता स्त्रिया होत्या. देवांना अत्यंत वाईट वाटले. त्या स्त्रियांनी वर मागितला. देवांनी दिला तो, ‘ हळद - कुंकू ही द्रव्ये स्त्रियांनी लावावीत, तरच त्या सौभाग्यवती, सुवासिनी स्त्रिया मानल्या जातील. ’ असा वर देऊन नेमाला दंडक घातला. तेव्हापासून स्त्रियांचे मानचिन्ह झाले. मात्र गतधवा  ( विधवा ) स्त्रीने नवरा वारल्यानंतर हळद - कुंकू लावले तर तिची उभय कुळे नरककुंडात सात जन्म पडतील. यासाठी पतिनिधनानंतर स्त्रिया हळद - कुंकू लावीत नाहीत.
जी सौभाग्यवती स्त्री कपाळी कुंकू लावीत नाही, त्या दुर्भागीचे तोंड पाहू नये. चुकून दृष्टीस पडल्यास सूर्यदर्शन घ्यावे म्हणजे पाप नष्ट होते.
answered Dec 17, 2015 by TransLiteral (9,660 points)
selected Aug 25, 2016 by TransLiteral Admin
...