• Register
1.2k views
in Hindu - Puja Vidhi by

1 Answer

0 votes
 
Best answer
पूजा करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितलेल्या आहेत. विधीवत पूजा केल्याने लवकरच पूजेचे फळ मिळते. त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तरी ब्राम्हणाला बोलावून त्याच्या हस्ते पूजा करून घेतली जाते. याचप्रकारे तुम्ही स्वतःही रोज पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात.
 
शास्त्रानूसार कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे असते. पूजेच्या आधी संकल्प केला नाही तर पूजा सफल होत नाही. संकल्पाविना पूजा केल्यास इंद्रदेवाला त्याचे फळ मिळते असे सांगितलेले आहे. त्यामुळे कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे आहे.
आता संकल्प घेणे म्हणजे इंद्रदेवाला आणि स्वतःला साक्षी ठेऊन यजमान अशी प्रतिज्ञा करतो, की मी हे कार्य इच्छापूर्तीसाठी करत असून ते मी अवश्य पूर्ण करीन. संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते. कारण पंचमाहाभूतांपैकी (अग्नि, पृथ्वी, आकाश, वायु आणि जल) गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. शेवटी पाणी गणपती समोर ठेऊन पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो .
एकदा संकल्प केल्यानंतर ती पूजा करणे गरजेचे असते. यामुळे आपली संकल्प शक्ती वाढते आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस प्राप्त होते.
by
selected by
...