• Register

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?

1,222 views
asked Nov 20, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,340 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
नीरांजनात फ़ुलवात किंवा वात लावून ते देवाच्या तोंडापासून पायापर्यंत ओवाळावे. वात पांढर्‍या स्वच्छ कापसाची असावी. ती तेलात भिजवू नये. शक्यतोपर्यंत तुपात भिजवावी. निरांनजासारख्या पात्रात दीप लावून तो ओवाळून झाल्यावर समईसारख्या उंच पात्रात ठेवण्याची व्यवस्था असावी. देवाच्या तोंडावर उजेड पडेल अशा ठिकाणी दीप ठेवावा. देवावर अंधार पडेल अशा ठिकाणी दीप ठेवू नये.
दीप लावताना दीपाने दीप लावू नये. काडीने दीप लावावा. दिव्याने दीप लावल्याने आणि विझल्यावर अर्धवट जळकट वातीची घाण सुटल्याने रोग व दारिद्र्य प्राप्त होते. जमिनीवर वात केव्हाही लावू नये. नीरांजनातून वात काढून ठेवू नये. अनेक वाती लावणे असल्यास विषम प्रमाणात म्हणजे १-३-५-७ अशा लावाव्यात. दीप लावताना त्यात वातीशिवाय थोडे तेल किंवा तेल घालावे.
answered Nov 20, 2015 by TransLiteral (9,340 points)
selected Aug 24, 2016 by TransLiteral Admin

Related questions

...