• Register

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?

528 views
asked Nov 20, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (10,840 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
प्राण ही एक जीवन चालविणारी शक्ती असून तिच्यामुळे विविध इंद्रियांना विविध प्रकारची शक्ती प्राप्त होत असते. हे प्राण पाच असल्याने त्यांना पंचप्राण म्हणतात. त्यांची नावे व शरिरान्तर्गत त्यांची कार्ये अशी - ( १ ) प्राण - अन्न आत घेणारा, ( २ ) आपान - मलमूत्रोत्सर्ग करणारा, ( ३ ) व्यान, अन्न पचविणारा - ( ४ ) उदान - शब्द उत्पन्न करणारा आणि  ( ५ ) समान - डोळ्यांची उघडझाप करणारा.
पाचही प्राणांची विशिष्ट स्थाने असून, ती खालील श्लोकात दिली आहेत -
हृदि प्राणो गुदेsपान: समानो नाभि मण्डते ।
उदान: कण्ठदेशे स्याद् व्यान: सर्वशरीरग: ॥
अर्थ - प्राण हृदयात, अपान गुदद्वारात, समान नाभीच्या ठिकाणी, उदान कंठस्थानी आणि व्यान सर्व शरीरात संचार करणारा असतो.
भोजनाच्या सुरुवातीला पंचप्राणांना पाच आहुती देतात. यासंबंधी मंत्र ‘ संध्ये ’ च्या पुस्तकात पाहावेत.
answered Nov 20, 2015 by TransLiteral (10,840 points)
selected Jan 3, 2017 by TransLiteral Admin
...