• Register

मंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात ?

768 views
asked Feb 22, 2014 in Hindu - Traditions by anonymous

1 Answer

0 votes
 
Best answer
याबद्दल गणेशपुराणांत उपासना खंड अध्याय ७४ मध्ये खालील कथा सांगितली आहे--
भारद्वाज मुनींना पृथ्वीपासून जास्वंदीच्या फुलासारखा लाल पुत्र झाला. त्यांचे नांव भौम असे होते. योग्य समयी मुनींनीं त्यास उपदेश करून गणेशाचा शुभ मंत्रहि दिला. नर्मदातीरीं इंद्रीयांचे नियमन करून मनामध्यें हेरंबाचे ध्यान करीत त्यानें परममंत्राचा ( एकाक्षरी ) जप केला. माघ वद्य चतुर्थीला मंगळवारीं दशभुज गणपतीने त्यास दर्शन दिले. गणेशानें त्यास वर देतांना म्हटलें की, " ही तिथी सर्व संकटांचे हरण करणारी व व्रत करणारास इष्टफल देणारी होईल. हे भौमा, तूं देवांसह अमृत प्राशन करशील व जगामध्ये ‘ मंगल ’ या नांवानें प्रसिद्ध होशील. तुझा वर्ण लाल आहे व पृथ्वीपुत्र असल्यानें तुला ‘ अंगारक ’ असेही म्हणतील." अशा रीतीनें भौमानें-मंगलानें-अंगारकानें केलेली संकष्टी चतुर्थी ‘ अंगारक चतुर्थी ’ या नांवानें प्रसिद्ध झाली.
answered Feb 22, 2014 by anonymous
selected Feb 22, 2014
...