• Register

सोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही?

663 views
asked Feb 21, 2014 in Hindu - Beliefs by anonymous
edited Feb 21, 2014

1 Answer

+1 vote
 
Best answer

पिप्पलाद हा एक उपनिषत्कालीन ऋषी आणि अथर्ववेदाचा आद्य संकलनकर्ता होय. याच्या जन्मापूर्वीच याचा पिता दधीची मृत झाला. दधीचीच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याची पत्नी प्रातिथेची हिने आपले उदरविदारण करून यास बाहेर काढले, आणि यास एका पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन ती सती गेली. पिंपळाच्या झाडाने याचे ऊन पावसापासून रक्षण केले, पशुपक्ष्यांनी त्यास अन्न भरविले, आणि सोमाने यास सलकविध्या पारंगत केले. अशा तर्‍हेने मातृपितृविरहित अनाथ अवस्थेत हा लहानाचा मोठा झाला. आपल्या दुःखी बाल्यकाळास शनि ग्र जबाबदार आहे, अशा समजुतीने याने त्यास ग्रहमंडळातून खाली ओढले. तेव्हा शनि यास शरण आला. सोळा वर्षांखालील मुलांना त्रस्त करावयाचे नाही, या अटीवर याने त्यास अभय दिले. ( शिवपुराण शत. २४-२५)

answered Feb 21, 2014 by anonymous
selected Feb 22, 2014
...