• Register

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?

1,030 views
asked Feb 7, 2014 in Hindu - Beliefs by anonymous
edited Feb 7, 2014

1 Answer

0 votes
 
Best answer

अलक्ष्मी ही पौराणिक साहित्यात निर्देशिलेली एक देवता. लक्ष्मीची ही थोरली बहीण असून तिचे गुणधर्म लक्ष्मीच्या अगदी विरोधी असे होते, असे तिच्या  अलक्ष्मी नावावरूनच दिसते. लक्ष्मीची थोरली बहीण म्हणून ही ‘ ज्येष्ठा ’ या वैकल्पिक नावाने ओळखली जाते.
पद्म पुराणात--लक्ष्मीचे लग्न विष्णूशी होण्याआधी हिचा विवाह उद्दालक नामक ऋषीशी करून देण्यात आला. ऋषीशी लग्न झाल्यानंतरहि हिच्या मूळ स्वभावात बदल झाला नाही. वैदिक धर्माचा हिला तिटकारा असे, आणि मद्य, द्यूत आदींविषयी प्रेम असे.
हिच्या स्वभावाला कंटाळून उद्दालक ऋषी हिला पिंपळाच्या झाडाखाली बसवून नाहिसा झाला. तेव्हा ही रडू लागली. लक्ष्मी विष्णूसह आपल्या बहिणीच्या समाचारास आली. विष्णूने हिला पिंपळाच्या तळाशी राहण्यास सांगितले, व जे हिची पूजा करतील व पिंपळाला स्पर्श करतील त्यांना लक्ष्मी प्राप्त होईल असा हिला वर दिला. म्हणून शनिवारी पिंपळाला स्पर्श करून पूजा करतात.

संदर्भ-प्राचीन चरित्रकोश, प्रथम खंड

 

अलक्ष्मी ही पौराणिक साहित्यात निर्देशिलेली एक देवता. लक्ष्मीची ही थोरली बहीण असून तिचे गुणधर्म लक्ष्मीच्या अगदी विरोधी असे होते, असे तिच्या  अलक्ष्मी नावावरूनच दिसते. लक्ष्मीची थोरली बहीण म्हणून ही ‘ ज्येष्ठा ’ या वैकल्पिक नावाने ओळखली जाते.
सनत्सुजात संहितेमध्ये--लक्ष्मीचे श्रीविष्णूशी लग्न ठरले. परंतु लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी असणार्‍या हिचे लग्न कोठेच ठरेना. लक्ष्मीचे लग्न अडून राहिले. तेव्हा हिचे लग्न एका ब्राह्मणाशी लावून देण्यात आले. परंतु त्या ब्राह्मणाने हिला टाकले. ही पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसली. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मी हिला भेटण्यास येऊ लागली. तेव्हापासून शनिवारच्या एका दिवशी पिंपळाचा स्पर्श हा लक्ष्मीप्रद आणि अन्य दिवशी दारिद्र्य देणारा असे मानण्यात येउ लागले.
(  सनत्सुजात संहितांतर्गत ‘ कार्तिकमाहात्म्य ’ )

 

संदर्भ प्राचीन चरित्रकोश प्रथम खंड

answered Feb 7, 2014 by anonymous
selected Feb 21, 2014

Related questions

...